४० वर्षात नाही तर ४० दिवसात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाचा दुसरा मजला खासदार निधीतून बांधून देईन:खासदार सुजय विखे

अहमदनगर (प्रतिनिधी) कोरोना काळात मला दोन वर्ष भेटता आले नाही.बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाचा दुसरा मजला ४० वर्षात नाही तर अवघ्या ४० दिवसात बांधून देईन.असे प्रतिपादन मंगलगेट येथील सामाजिक सभागृह उदघाटन प्रसंगी खासदार सुजय विखे यांनी केले.
मंगलगेट येथील बोधिसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सभागृहाचे उदघाटन नुकतेच अहमदनगर दक्षिण लोकसभेचे खासदार डॉ.सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी माजी आमदार दादाभाऊ कळमकर,पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश सचिव सुनील क्षेत्रे,नगरसेविका अश्विनीताई जाधव, माजी सभापती सचिन जाधव, माजी नगरसेवक भाऊसाहेब उनवणे,प्रा.जयंत गायकवाड, वंचित बहुजन आघाडीचे नेते सुनिल शिंदे,देशस्तंभ न्यूज नेटवर्कचे संपादक महेश भोसले,नितीन कसबेकर,सुरेश भिंगारदिवे,संजय भिंगारदिवे,भंतेजी संजय कांबळे, रोहित (बंडू) आव्हाड, संजय जगताप,भिंगार आरपीआयचे अमित काळे,बहुजन रयत परिषदेचे शहर अध्यक्ष सतीश थोरात, जेष्ठ मार्गदर्शक भगवान साळवे,जेष्ठ मार्गदर्शक अशोक गाडे,दया गजभिये,अजय पाखरे,विशाल गायकवाड,तुकाराम गायकवाड, नईम शेख,अतुल सोनवणे,भिंगार अर्बन बँकेचे संचालक नामदेव लंगोटे,सुरेशभाऊ बनसोडे, सामाजिक कार्यकर्ते शरदभाऊ मुर्तुडकर, सामाजिक कार्यकर्ते सागर मुर्तूडकर,विशाल भिंगारदिवे, माजी नगरसेवक सुनील भिंगारे,गौतमी भिंगारदिवे,रेखा डोळस,आरती शेलार,मिरा गवळी,लता बर्डे,रंजना भिंगारदिवे,सुनीता भिंगारदिवे,संगीता बारवेकर, सुमनताई काळापहाड,शबाना शेख,नयन खंदारे,सामजिक कार्यकर्ते संजय शिंदे,आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी अध्यक्ष खासदार सुजय विखे बोलतांना म्हणाले,मला प्रत्येक मान्यवरांच्या भाषणातून जाणवले १७ लाखाच्या सामजिक सभागृहाच्या कामात राजकारण आल्याने ३० वर्ष लागले.मी ५०० कोटीचा उड्डाणपूल अवघ्या दीड वर्षात उभा केला.सामाजिक सभागृहाच्या कामात राजकारण आणणे हे दुर्दैवी आहे
.समाज उपयोगी प्रकल्पात राजकारण आणणे हे चुकीचे आहे.भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराशी निगडीत असणाऱ्या सर्व एकत्र येऊन शासनाच्या योजना समजावून घेण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आरक्षण आहे. व आरक्षणामुळे शैक्षणिक सुविधा निर्माण झाल्या व या सुविधांमुळे उच्चपदावर पोहचलेले तरुण समाजासाठी कार्य करत नाहीत हे दुर्दैव असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.पुढच्या आठवड्यात नगर शहर व नगर तालुका तहसील असे दोन तहसील कार्यालय होणार असून यामुळे तहसील कार्यालयात होणाऱ्या कामाची विभागणी होईल असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.जयंत गायकवाड व महेश भोसले यांनी केले.कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात पीआरपीचे प्रदेश सचिव सुनील क्षेत्रे यांनी समाज मंदिराच्या कामाचा ३० वर्षाच्या कामाचा इतिहास मांडला.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंगलगेट परिसरातील युवा सेनेचे नेते मुन्ना भिंगारदिवे,युवा नेते सागर क्षेत्रे,आकाश सरोदे,नितीन म्हस्के,प्रवीण ठोंबे,संजय शिंदे,अनिकेत शिंदे, सिद्धार्थ शिंदे,निपुण भिंगारदिवे,सुबोध ठोंबे,राजेश भिंगारदिवे,निलेश पाटोळे,शुभम पाडले,रोहित कांबळे,गौरव गायकवाड,सोनू म्हस्के,गणेश कांबळे,मनोज सगळगीले,जयंत पटेकर,हिरामण भिंगारदिवे,राकेश वाघमारे आदिनी खूप परिश्रम घेतले.या कार्यक्रमास परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.