सामाजिक
“आहे कुणाचं योगदान, लाल दिव्याच्या गाडीला! ” ” तू इतकं दिलं आम्हा हे कधी सराव, तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं! ” रिपब्लिकन सेनेने केले सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचे स्वागत!


अशी अनेक भीमागीते ते व चित्रपट गीते गाणारे सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे 27 जुलै रोजी अहिल्यानगर शहरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा अनावरण सोहळ्यासाठी आले होते. या सोहळ्यात त्यांनी भिमगीत गायनाचा विशेष कार्यक्रम केला.
यावेळी रिपब्लिकन सेनेचे जिल्हा अध्यक्ष सुनिल शिंदे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख महेश भोसले,बौद्धाचार्य दिपक अमृत, युवक जिल्हा अध्यक्ष अतुल भिंगारदिवे, माजी नगरसेवक विजय गव्हाळे, शिवसेना शिंदे गटाचे विनोद गायकवाड, प्रा. सतीशकुमार चाबूकस्वार, शहर उपाध्यक्ष विवेक विधाते, सामाजिक कार्यकर्ते संजय ताकवले,विकास रणदिवे, गौरव विजय गव्हाळे, निखिल गायकवाड आदी उपस्थित होते.