देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर:दि: 28 जुलै:
दिनांक 27/07/2025 रोजी रात्री 10.30 वा. पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांना गुप्त बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की, आनंधाम, मार्केटयार्ड परिसरात एका कारमध्ये एक इसम हा महाराष्ट्रराज्यात प्रतीबंधीत असलेलासुगंधीत तंबाखुजन्य पदार्थ विक्री करण्याचे उदेशाने स्वतःचे कब्जात बाळगत आहे अशी माहिती मिळाल्याने तात्काळ पोलीस निरीक्षक श्री.प्रताप दराडे यांचे आदेशाने पोलीस म.पो.स.ई.शितल मुगडे यांनी पोलीस स्टाफ व दोन पंच असे सदर चारचाकी वाहनाचा शोध घेत असतांना आनंदधाम येथील मार्केटयार्ड ते आनदंऋषीजी हॉस्पीटल रोड, पॉलीटेक्नीक कॉलेज समोर, ता.जि.अहिल्यानगर येथे एक चारचाकी वाहन थांबविले असता सदर वाहन चालक हा वाहन घेवुन पळुन जात असतांना मार्केटयार्ड ते आनंऋषीजी हॉस्पीटल रोड, पॉलीटेक्नीक कॉलेज समोर, छापा टाकला असता सदर चारचाकी वाहनात एक इसम दिसुन आला. त्यावेळी सदर इसमास त्यांचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नाव- शरद अर्जुंन पवार,वय-30 वर्ष, रा. जाम, पोस्ट कौडगाव, ता.जि.अहिल्यानगर असे असल्याचे सांगितले. त्यावेळी पोलीस म.पो.स.ई./शितल मुगडे यांनी पोलीस स्टाफ व दोन पंच अशंची ओळख सांगुन त्यांना झडतीचा उद्देश समजावुन सांगुन सदर चारचाकी वाहनाची व सदर इसमाची झडती घेतली असता त्याचे ताब्यात एकुण – 3,99,712/- रुपये कंमतीचा मुदेमाल मिळुन आल्याने सदर मुह्देमाल म.पो.स.ई.शितल मुगडे यांनी पंचासमक्ष जागीच जप्त केला आहे. सदरचा जप्त मुदेमाल व आरोपी यांना पुढील ‘कारवाई ‘करणेकरीता कोतवालो पोलीस स्टेशनला आणले असुन पोकॉ/ 101 सोमनाथ सुधाकर केकान यांचे फिर्यादी वरुन त्यांचेविरुध्द कोतवाली पोलीस स्टेशन, अहिल्यानगर गु.र.नं. 684/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम- 123, 223,274, 275 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असुन सदर गुन्ह्याचा तपास म.पो.स.ई.शितल मुगडे ह्या करित आहेत.सदरची कारवाई ही मा.पोलीस अधीक्षक श्री.सोमनाथ घार्गे , मा.अपर पोलीस अधिक्षक श्री वैमव कलबुर्गे साहेब, मा.उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग श्री.अमोल भारती यांचे मार्गंद्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री प्रताप दराडे, म.पो.स.ई.शितल मुगडे, पो.स.ईं.।गणेश देशमुख, पोसईं कृष्कुमार सेदवाड,पोहेकॉ/बाळकृष्ण दौंड, विशाल दळवी, सलीम शेख, विनोद बोरगे, सुर्यकांत डाके, योगेश कवाष्टे, राहुल शिंदे पोकॉ अभय कदम, सत्यजीत शिदे, अमोल गाडे, अतुल काजळे, सोमनाथ केकाण, महेश पवार, शिरीष तरटे, सचिन लोळगे, दत्तात्रय कोतकर, संदीप कव्हळे प्रतिभा नागरे, हिना बागवान, दक्षिण मोबाईल सेलचे पोकॉ राहूल गुंड यांचे पथकाने केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा