देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क (देवदत्त साळवे तालुका प्रतिनिधी)
पिंपळगाव तुर्क विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आर्थिक वर्ष 2024 25 मध्ये बँक पातळीवर १००% वसूल झाल्याबद्दल विविध कार्यकारी सेवा संस्थेचे *चेअरमन श्री भास्कर रेवजी गाडे, त्याचबरोबर व्हाईस चेअरमन श्री गफूर पापाभाई शेख संचालक श्री भाऊसाहेब सखाराम वाळुंज* यांचा सत्कार *जिल्हा बँकेच्या संचालिका मा. श्रीमती गीतांजलीताई शेळके तसेच पारनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक माननीय श्री डॉक्टर खोडदे यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.
पीक कर्जाव्यतिरिक्त मध्यम मुदत कर्जा अंतर्गत शेतकऱ्यांसाठी पाईपलाईन, ट्रॅक्टर तसेच संकरित गाय खरेदी करण्यासाठी सुद्धा संस्थेमार्फत कर्ज दिले जाते असे चेअरमन श्री भास्कर गाडे यांनी सांगितले.
संस्थेचे सचिव श्री ठकाजी ठाणगे यांचे काम उल्लेखनीय आहे. त्यांच्याकडे असलेल्या विविध कार्यकारी सेवा संस्था पिंपळगाव तुर्क, श्रीराम विविध कार्यकारी सेवा संस्था काकणेवाडी तसेच विविध कार्यकारी सेवा संस्था वेसदरे या तीनही संस्था बँक पातळीवर आलेल्या असून 100% वसूल झालेला आहे या तीनही संस्थांचाही सन्मान आज पारनेर या ठिकाणी झालेला आहे.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री सावकार शिंदे सर, उपसरपंच श्री इसाक भाई शेख, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ वाळुंज , प्रताप वाळुंज , प्रशांत वाळुंज,संकेत शिंदे, किरण गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री बाबाजी वाळुंज, संस्थेचे चेअरमन ,व्हाईस चेअरमन, सर्व संचालक तसेच माजी चेअरमन श्री सरदार भाई शेख ,श्री विजय गवळी सचिव श्री ठकाजी ठाणगे यांचे संस्था बँक पातळीपर्यंत घेऊन जाणे कामी 100 % वसुली करणे कामी मोलाचे योगदान लाभलेले आहे.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते श्री सावकार शिंदे सर, उपसरपंच श्री इसाक भाई शेख, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ वाळुंज , प्रताप वाळुंज , प्रशांत वाळुंज,संकेत शिंदे, किरण गाडे आदी मान्यवर उपस्थित होते.
संस्था बँक पातळी पर्यंत नेण्यासाठी 100% वसूल करणे कामी ए डी सी सी बँक शाखा कान्हूर पठारचे शाखाधिकारी माननीय श्री साहेबराव झावरे साहेब तसेच टी डी ओ मा.श्री प्रभाकर लाळगे साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले .संस्थेचे संस्थापक चेअरमन श्री बाबाजी वाळुंज, संस्थेचे चेअरमन ,व्हाईस चेअरमन, सर्व संचालक तसेच माजी चेअरमन श्री सरदार भाई शेख ,श्री विजय गवळी सचिव श्री ठकाजी ठाणगे यांचे संस्था बँक पातळीपर्यंत घेऊन जाणे कामी 100 % वसुली करणे कामी मोलाचे योगदान लाभलेले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा