देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क:अहिल्यानगर दि. 1 डिसेंबर: पूर्वीच्या काळी म्हणजे नगर शहरांमध्ये ज्यावेळेस नगरपालिका अस्तित्वात होती. त्यावेळेस नगरपालिकेचे तत्कालीन नगराध्यक्ष नवनीत भाई बार्शीकर हे असताना त्यांच्या कालखंडात नगरवासीयांसाठी अनेक प्रकारची विधायक कामे झालेली आपणास दिसतात. याच कालखंडात नगर शहरांमध्ये बाळासाहेब देशपांडे हे दानशूर व्यक्तिमत्व होऊन गेले. त्यांनी नगर शहराच्या विकासासाठी त्यांच्या स्वतःच्या अनेक जागा नगरपालिकेला कराराने दिल्या. त्यापाठीमागे समाजसेवेचा एक उदात्त हेतू होता.त्यावेळेस त्यांनी शहरातील नागरिकांना उद्यानासाठी, जलतरण प्रेमींना, पोहण्यासाठी त्याचप्रमाणे गोरगरीब नागरिकांच्या आरोग्यासाठी व गोरगरीब विद्यार्थी शिकावेत. या हेतूने नगरपालिकेला अनेक जागा दान केल्या. आजही जुन्या पिढीतील लोक कै.बाळासाहेब देशपांडे उद्यान म्हणजे सिद्धीबागेत फिरायला येतात परंतु आज “कै. बाळासाहेब देशपांडे उद्यान” या नावाच्या जागेवर “श्री सिद्धेश्वर महादेव मंदिर (ट्रस्ट)” नावाच्या फलकाने आतिक्रमन केलेले दिसते.
ही जागा महानगर पालिकेने सिद्धेश्वर मंदिर ट्रस्टला कराराने दिली की काय? अशा प्रकारचा प्रश्न नागरिकांच्या मनामध्ये निर्माण झाला आहे. कै. बाळासाहेब देशपांडे उद्यान या नावावर मागील एक वर्षापासून सिद्धेश्वर महादेव मंदिर ( ट्रस्ट) सिद्धीबाग, अहमदनगर या नावाचा फलक लावलेला आहे. याबाबत आत्ताच्या महापालिका प्रशासनाने ही जागा सिद्धेश्वर महादेव मंदिर ट्रस्टला कराराने दिली आहे का? अशा प्रश्नार्थक चर्चा कै. बाळासाहेब देशपांडे उद्यानात फिरायला येणाऱ्या नागरिकांमधून जडत आहेत. याबाबत महापालिकेचे कारभारी आयुक्त डांगे हे कारवाई करतील का? याकडे अहिल्यानगर वासियांचे लक्ष लागले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा