देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 23 डिसेंबर: संपूर्ण महाराष्ट्रात महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. नुकत्याच राज्यातील नगरपालिका व नगर परिषदा यांचे निकाल लागले आहेत. लवकरच म्हणजे 15 जानेवारीला राज्यातील महानगर पालिकेच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे साहजिकच राजकीय वातावरण तापू लागले आहे.
लवकरच जिल्हा परिषद व पंचायत समित्या यांच्या देखील निवडणुकीच्या घोषनेची शक्यता वर्तविली जात आहे. आहिल्यानगर तालुक्यातील दरेवाडी जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती पुरुष वर्गासाठी राखीव झाला आहे. त्यामुळे साहजिकच सर्वच इच्छुक उमेदवारांनी विविध राजकीय पक्षाँकडे तिकिटासाठी मोर्चे बांधणी सुरु केली असल्याचे चित्र दरेवाडी गटात आहे.
दरेवाडी येथील तरुण सामाजिक कार्यकर्ते माजी जिल्हा परिषद सदस्या दिवंगत शारदाताई भिंगारदिवे यांचे नातू व माजी जिल्हा परिषद सदस्या पूनमताई भिंगारदिवे व दिवंगत रोहिदास भिंगारदिवे यांचे चिरंजीव श्रेयश रोहिदास भिंगारदिवे हे आजी, आई, वडील यांच्या सामाजिक कार्याच्या जोरावर या निवडणुकीला समोरे जात आहेत.
अत्यंत शांत, उच्चशिक्षित, संयमी स्वभावाने ते पूर्ण दरेवाडी गावामध्ये व मतदार संघामध्ये परिचित आहेत. तरुण मतदारा प्रमाणेच, वृद्ध, महिला, या मतदाराकडून कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसलेल्या श्रेयश भिंगारदिवे यांना दरेवाडी गावातील पूर्ण ग्रामस्थामधून मोठा पाठिंबा तर मिळतच आहे. तसेच मतदार संघातून देखील पाठिंबा मिळत आहे.
माजी जिल्हा परिषद सदस्या दिवंगत शारदाताई भिंगारदिवे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेत 2012 साली अरणगाव गटातून दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष ना. रामदास आठवले यांनी तिकीट मिळवून देण्यासाठी महत्वाची भूमिका बजावली होती. 2012च्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदारांनी शारदाताईना भरघोस मतांनी विजयी केले होते. दिवंगत शारदाताई यांनी दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्या माध्यमातून मतदार संघात समाज मंदिरे, रस्ते, व विविध विकास कामे केली आहेत. दुर्दैवाने 2014 साली त्यांचे हृदय विकारानेनिधन झाले.
रिक्त झालेल्या जागेवर त्यांच्या सुनबाई पूनमताई भिंगारदिवे यांना दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डीले, दिवंगत आमदार अरुणकाका जगताप यांनी विशेष प्रयत्नातून बिनविरोध निवडून आणले. एकंदरीतच तीन पिढीच्या सामाजिक कार्याचा कित्ता गिरवत श्रेयश रोहिदास भिंगारदिवे हे या निवडणुकीत उतरणार असल्यामुळे त्याच्या दरेवाडी गावातून पूर्ण ग्रामस्थ बाजीराव भिंगारदिवे, सुरेश भिंगारदिवे, विद्वान भिंगारदिवे, संदेश भिंगारदिवे, डॉ निलेश भिंगारदिवे, सनी भिंगारदिवे, विकास भिंगारदिवे, शरद भिंगारदिवे, सखाराम भिंगारदिवे, अमोल भिंगारदिवे, मनोज भिंगारदिवे, विशाल भिंगारदिवे, विजय भिंगारदिवे, आकाश भिंगारदिवे, रामा भिंगारदिवे, सुमेध भिंगार दिवे, नवीन भिंगारदिवे, शशिकांत भिंगारदिवे, राहुल भिंगारदिवे, सचिन भिंगारदिवे, दिपक भिंगारदिवे, विजय नाथा भिंगारदिवे, राजू भिंगारदिवे, विजय लोखंडे, उमेश लोखंडे, विठ्ठल लोखंडे, आकाश शिंदे, राहुल शिंदे, प्रवीण शिंदे, सुभाष चाबुकस्वार, प्रवीण गायकवाड, चिनू गायकवाड, संतोष न्नवरे, सचिन न्नवरे, सचिन लोखंडे, गणेश भिंगारदिवे, प्रतीक साळवे, ऋषी विधाते, तसेच मतदार संघातील सोळा गावामध्ये असलेले नातेवाईक, मित्र परिवार यांचा उस्फूर्त पाठिंबा मिळत असल्याचे चित्र आहे.
यावेळी प्रसार माध्यमाशी बोलतांना सामाजिक कार्यकर्ते श्रेयश रोहिदास भिंगारदिवे म्हणाले
, “तीन पिढ्याचा समाज कार्याचा वारसा आजी माजी जिल्हा परिषद सदस्या दिवंगत शारदाताई भिंगारदिवे वडील दिवंगत सामाजिक कार्यकर्ते रोहिदास भिंगारदिवे,आई माजी जिल्हा परिषद सदस्या पूनमताई भिंगारदिवे,यांचा मतदारांसाठी असलेला जिव्हाळा व सुशिक्षित तरुण मतदार यांच्याशी माझा असलेला संपर्क सामान्य माणसाचा व मतदार संघातील यांच्या समस्या या मुद्यावर मी निवडणूक लढवत असून आमच्या घरात समाजसेवेची आवड पहिल्यापासूनच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले”.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा