देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 22 डिसेंबर: राज्यात झालेल्या नगरपालिका, व नगर परिषद निवडणुकीत नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी नगर परिषद निवडणुकीत रिपब्लिकन सेनेच्या तीन नगर सेवकांनी दणदणीत विजय मिळवत इगतपुरी नगर परिषदेत दमदार एन्ट्री केली आहे. रिपब्लिकन सेनेचे विजयी नगरसेवक: १. अतिष मनोहर २. माया गवळी ३. आशा भडांगे
रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी या तीनही विजयी नगरसेवकांचे मी मनःपूर्वक अभिनंदन करतो. व त्यांना पुढील कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा देतो.
तसेच, या यशामागे अहोरात्र मेहनत घेणाऱ्या रिपब्लिकन सेना नाशिक जिल्ह्याच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानतो. त्यांच्या समर्पणामुळेच आज रिपब्लिकन सेनेला हा विजय मिळाला आहे.
पुन्हा एकदा सर्व विजयी नगरसेवकांचे अभिनंदन व इगतपुरीच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांच्या पुढील कार्यास मनापासून शुभेच्छा! असे शुभेच्छापर संदेशात म्हटले आहे. रिपब्लिकन सेनेच्या विजयी नगर सेवकांवर नाशिक जिल्ह्यातून अभिनंदनाचा व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.