गुन्हेगारी

श्रीरामपूर मधील कुख्यात मुल्ला कटर टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) अंतर्गत कारवाई! अहमदनगर पोलीस दलाची दणकेबाज कारवाई!

श्रीरामपूर (प्रतिनिधी) अहमदनगर पोलीस दलाने दणकेबाज कारवाई करत श्रीरामपूर मधील कुख्यात मुल्ला कटर टोळीविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) अंतर्गत कारवाई केली आहे. या कारवाईमुळे संघटित गुन्हेगारी करणाऱ्या टोळ्यांना चांगलाच जरब बसणार असल्याची चर्चा जिल्ह्यातील नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या गु.र.नं.666/2022 भादवि कलम 363 (अ), 368, 370 (4), 370(अ),पोक्सो,3,4,5,(G),6,17 पिटा ॲक्ट 4,5,6,7,अ.जा.ज.अ.प्र.का.क 3(1),(w)(i),(ii),3(2),(v),(3)(2)(5a) प्रमाणे दाखल गुन्ह्यात मुल्ला कटर टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा ( मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.टोळीचा टोळीप्रमुख इम्रान युसुफ कुरेशी उर्फ मुल्ला कटर वय 35 रा.वॉर्ड नंबर 2 श्रीरामपूर हा असून त्याचे श्रीरामपूर शहरात कायम वास्तव्य आहे तो आणि टोळीतील इतर सदस्यांनी वेळोवेळी एकत्र येऊन संघटितपणे मालमत्ता विषयक,शरीराविरुद्धचे,महिला अत्याचार संबंधी गुन्हे केल्याचे उघड झाले आहे मुल्ला कटर हा कोणत्याही प्रकारचा कामधंदा करीत नसून बळाचा वापर करून आर्थिक फायदा मिळविण्याकरिता तो वेळोवेळी त्याचे टोळीतील साथीदारांसह श्रीरामपूर शहर परिसरात अत्यंत गंभीर स्वरूपाचे गुन्हे करीत असतो,त्यामुळे टोळीप्रमुख व टोळी सदस्या विषयी श्रीरामपूर शहर व परिसरातील सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण केलेले होते.श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 2 येथे राहणारी पिडीत हिच्यावर आरोपींनी सामूहिक बलात्कार करून तिला पांढरीपुल येथे टोळी सदस्य बाबा चेंडवाल यास विक्री केली टोळी सदस्य बाबा चेंडवाल याने तिचेवर बळजबरीने तिच्यावर अत्याचार केले व वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले तसेच टोळीप्रमुख मुल्ला कटर,बाबा चेंडवाल,पप्पू उर्फ प्रशांत दादासाहेब गोरे यांनी पीडितेची शेवगाव येथे कुंटणखाण्यात विक्री केली सदर गुन्ह्यात महिला आरोपी नामे सुमन मधुकर पगारे व सचिन मधुकर पगारे यांनी मदत केल्याचे तसेच वेश्याव्यवसाय करून मिळणाऱ्या पैशावर उदरनिर्वाह केल्याचे निष्पन्न झाल्याने गुन्ह्याचे तपासी अधिकारी Dysp संदीप मिटके यांनी सदर गुन्ह्यास महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंध अधिनियम 1999 चे कलम 3 (1),(ii),3(2),3(4)प्रमाणे वाढीव कलम लावण्यास मंजुरी मिळणे बाबतचा प्रस्ताव अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर ,पोलीस अधीक्षक अहमदनगर यांच्या मार्फत विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक परीक्षेत्र यांना सादर केला असता त्यांनी मंजुरी दिल्याने सदर गुन्ह्यास मोक्का कायद्यान्वये कलमवाढ करून कारवाई करण्यात आली.सदरची कारवाई नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा.B.G. शेखर पाटील, मा.श्री.मनोज पाटील पोलीस अधीक्षक,मा.स्वाती भोर,यांच्या मार्गदर्शनाखाली Dysp संदीप मिटके,PI गवळी,API बोरसे,psi सुरवडे, Lpn अश्विनी पवार,PN संतोष दरेकर,Pc,रवींद्र माळी,विलास उकिरडे यांनी केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे