सामाजिक

संविधान सन्मान मेळावा २ सप्टेंबर रोजी अहमदनगर शहरात होणार- आमदार संग्राम जगताप

अहमदनगर (प्रतिनिधी)- संविधान सन्मान महामेळावा संदर्भात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये आमदार संग्राम जगताप म्हणाले की, २ सप्टेंबरला अहमदनगर शहरातील सहकार सभागृह येथे संविधान सन्मान मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यामध्ये देशाचे नेते रामदास आठवले व प्रा. जोगेंद्र कवाडे आदी सह विविध मान्यवर उपस्थित राहणार असून आंबेडकरी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले. व नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधी इंडिया आघाडीने एन डी ए सरकार संविधान बदलणार असा अप्रचार केला व तो केवळ जनतेची दिशाभूल करणारा स्टंट होता. त्यामुळे संविधानाच्या सन्मानार्थ नगर शहरात जिल्हाव्यापी संविधान सन्मान मेळाव्याचे २ सप्टेंबर २०२४ रोजी अहमदनगर शहरातील सहकार सभागृह या ठिकाणी दुपारी चार वाजता आयोजित केले असल्याची माहिती मिळाव्याचे स्वागत अध्यक्ष सुरेश भाऊ बनसोडे तसेच निमंत्रक सुमेध गायकवाड व अजय साळवे यांनी दिली आहे.
या संविधान सन्मान महामेळावा मध्ये माननीय  नामदार रामदासजी आठवले यांची सलग तिसऱ्यांदा मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल भव्य नागरी सत्कार तसेच नगर जिल्ह्याचे भूमिपुत्र शिवाजीराव गरजे यांची विधान परिषदेच्या नामदारपदी निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात येणार आहे या कार्यक्रमास पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा.जोगेंद्र कवाडे सर, तसेच जयदीप भाई कवाडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष सुनील मगरे, रिपब्लिकन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राजा सरवदे आदी प्रमुख उपस्थिती म्हणून राहणार आहे.
तसेच मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शहराचे आमदार संग्राम जगताप हे असणार आहे. त्यामुळे या मेळाव्याला जास्तीत जास्त फुले, शाहू, आंबेडकर व साठे चळवळीतील कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून भीमशक्तीचे विराट दर्शन घडवावे असे आवाहन करण्यात आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे