लेखा व कोषागार संचालक यांची जिल्हा कोषागार कार्यालयास भेट!

अहमदनगर, 16 जून (प्रतिनिधी)) – संचालक, लेखा व कोषागारे, मुंबई वैभव राजेघाटगे यांनी निरीक्षण अहवाल वाचनाच्या अनुषंगाने अहमदनगर, जिल्हा कोषागार कार्यालयास भेट दिली. त्यांचे सोबत निलेश राजुरकर , सहसंचालक, लेखा व कोषागारे, नाशिक विभाग नाशिक हे सुध्दा उपस्थित होते.
सर्व प्रथम कोषागारात त्यांचे आगमन होताच त्यांना पोलीस पथका मार्फत गार्ड ऑफ ऑनर सन्मान देण्यांत आला. तदनंतर श्रीमती भाग्यश्री जाधव भोसले , जिल्हा कोषागार अधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले. या प्रसंगी श्री. राजेघाटगे, संचालक यांनी निरीक्षण अहवाला सोबतच कोषागारातील विविध विभागांची पाहणी करून कामकाजा बाबत मार्गदर्शन केले व कोषागार कार्यालयातील कामकाजाबाबत समाधान व्यक्त केलं. याप्रसंगी प्रकाश भाकरे, अप्पर कोषागार अधिकारी, निवृत्ती खेतमाळीस, अप्पर कोषागार अधिकारी, राजेंन्द्र येळीकर, अप्पर कोषागार अधिकारी, श्री. पिसे, सहाय्यक कोषागार अधिकारी, श्री. बुध्दीवंत, अप्पर कोषागार अधिकारी , योगेश वाघ, सहायक लेखाधिकारी व सर्व कोषागार कर्मचारी वृंद उपस्थित होते.