सामाजिक
पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने श्रीरामपूर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन!

श्रीरामपूर दि. १ ऑगस्ट (प्रतिनिधी)
पीपल्स रिपब्लिकन पार्टी श्रीरामपूर तालुक्याच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले.
यावेळी श्रीरामपूर तालुका अध्यक्ष संतोष मोकळ फौजदार सतीश गोरे लकी सेठी शंभूके विद्यार्थी वस्तीगृहाचे अध्यक्ष अशोकराव दिवे सर मिलिंद कुमार साळवे कवी आनंदा साळवे तालुका उपाध्यक्ष संजय त्रिभुवन तिसरी आदालत चे भाऊसाहेब जी खरात शिवाजी मामा कासार मामा सोमनाथ जानराव भगवान रोकडे मायकल मनतोडे आदींनी महात्मा फुले व अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन केले याप्रसंगी संतोष मोकळ अशोकराव दिवे सर भाऊसाहेब खरात लकी सेठी यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त केले कवी आनंदा साळवे यांनी पोवाडा गाऊन शुभेच्छा दिल्या.