लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती बोल्हेगावात उत्साहात संपन्न आकाश आल्हाट मित्र परिवाराच्या वतीने आयोजन

अहमदनगर दि. २ ऑगस्ट (प्रतिनिधी) : लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त बोल्हेगावातील आंबेडकर वसाहतीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिसरातील नागरिकांसाठी अन्नदानाचा भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या हस्ते साहित्यरत्न साठे, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करत सुरुवातीला अभिवादन करण्यात आले. आकाश आल्हाट मित्र परिवाराच्या वतीने भव्य जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित विविध कार्यक्रम उत्साहात संपन्न झाले.
बोल्हेगाव परिसरातील नागरिकांची, विशेषत: युवक व महिलांची यावेळी मोठ्या संख्येने उपस्थिती होती. यावेळी किरण काळे यांच्यासह महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते दशरथ शिंदे, ओबीसी काँग्रेस विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे, अल्पसंख्यांक शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला, ज्येष्ठ नेते सुनील क्षेत्रे, केडगाव विभाग प्रमुख विलास उबाळे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अल्तमश जरीवाला, शहर जिल्हा सरचिटणीस अभिनय गायकवाड, इंजिनिअर सुजित क्षेत्रे, बाबासाहेब वैरागर, जयराम आखाडे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी समाजाला पुढे आणण्यासाठी आपले आयुष्य वेचले. त्यांच्या विचारांतून आल्हाट मित्र परिवाराने प्रेरणा घेत जयंती कार्यक्रमाच्या निमित्ताने डीजे संस्कृतीला फाटा देत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे तसेच परिसरातील नागरिकांसाठी स्नेहभोजनाच्या उपक्रमाचे केलेले आयोजन कौतुकास्पद आहे. केवळ दीड दिवसांचं शालेय शिक्षण घेतलेल्या अण्णाभाऊंनी आपल्या दैदिप्यमान कार्य कर्तृत्वामुळे समाजात आपले आढळ स्थान निर्माण केले. नगर शहराशी देखील त्यांचा निकटचा ऋणानुबंध होता.
युवक काँग्रेस उपाध्यक्ष आकाश आल्हाट म्हणाले की, अण्णाभाऊ, डॉ. आंबेडकर यांनी त्यांचे सबंध आयुष्य समाजाच्या वेदनांना वाचा फोडण्यासाठी वेचलं. आजच्या तरुण पिढी समोर त्यांच्या कार्याचा आदर्श आहे. म्हणूनच आम्ही जयंती उत्सवाच्या निमित्ताने भरगच्च कार्यक्रमांचा आयोजन करत महापुरुषांचे विचार तरुणांसह समाजापर्यंत कसे पोहोचतील यासाठी पुढाकार घेतला. मित्र परिवाराने देखील यामध्ये उत्साहाने सहभागी होत कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कष्ट घेतले. आगामी काळात बोल्हेगावमधील नागरिकांच्या दैनंदिन आयुष्यातील नागरी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी मित्रपरिवारच्या व काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आक्रमकपणे काम करणार असल्याचे आल्हाट म्हणाले.
यावेळी संजय झिंजे, अनिस चुडीवाला यांची देखील भाषणे झाली. आकाश आल्हाट मित्र परिवाराचे सदस्य बिभीषण चव्हाण, राजू क्षेत्रे, सामाजिक न्याय काँग्रेस युवा विभागाचे शहर जिल्हाध्यक्ष प्रणव मकासरे, युवक काँग्रेस सरचिटणीस आनंद जवंजाळ, युवक उपाध्यक्ष विकास भिंगारदिवे, समीर शेख, प्रदीप घोरपडे, हर्षल उजागरे, राकेश पवार, भीमा रणसिंग, वैभव दिवटे, महेश काळे, ओंकार काळे, दादा पवार, अक्षय साळवे, कुणाल उजागरे, सागर नेटके, लखन दिवटे, सुचित वघाडे, अभय डोळस, आकाश पाटोळे, आदित्य वाल्हेकर, दर्शन आल्हाट, सुरेश घोडके, अजय रणसिंग, लखन घोरपडे, रॉबिन चव्हाण, सुनील खामकर, लखन लोखंडे, आर्यन कांबळे, योहान मकासरे, आनंद मिसाळ, सुरज बोर्डे आदींसह कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.