स्थानिक गुन्हे शाखेकडुन जुलै महिन्यात अवैध धंद्यावर कारवाई दोन कोटी सात लाख त्रेसष्ठ हजाराचा मुद्देमाल जप्त

अहमदनगर दि. २ (प्रतिनिधी) जिल्हा पोलीस अधीक्षक
राकेश ओला यांनी पोनि/श्री. दिनेश आहेर, स्थानिक गुन्हे शाखा, अहमदनगर यांना माहे जुलै 2023 मध्ये जिल्ह्यातील अवैध धंद्याचे समुळ उच्चाटण करण्याचे दृष्टीने जास्तीत जास्त अवैध धंद्याविरुध्द कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांची विविध पथके तयार करुन जिल्ह्यातील दारु, जुगार, गुटखा, पानमसाला, रेशनिंग, गोवंश व वाळु अशा अवैध धंद्यांची माहिती घेवुन कडक कारवाई करणे बाबत मार्गदर्शन केले. दरम्यान स्थागुशा पथकांनी एकुण 156 गुन्हे गुन्हे दाखल करुन 2 कोटी 7 लाख 63 हजार 642 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला. तसेच स्थागुशा पथक यापुढे देखील अवैध धंद्याविरुध्द कारवाई सुरु ठेवणार आहे.
स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्या विरुध्द माहे जुलै 2023 मध्ये केलेली कारवाई बाबत माहिती.
अ.क्र. प्रकार दाखल केसेस आरोपी संख्या जप्त मुद्देमाल
1. दारुबंदी 93 95 60,75,236/-
2. जुगार 51 77 6,87,380/-
3. गुटखा व पानमसाला 8 19 26,98,526/-
4. रेशनिंग 2 7 1,02,90,000/-
5. गोवंश 1 4 5,02,500/-
6. वाळु 1 2 5,10,000/-
एकुण 156 204 2,07,63,642/-/-
सदर कारवाई राकेश ओला , पोलीस अधीक्षक, अहमदनगर, प्रशांत खैरे ,अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.