एटीएम फोडणारी टोळी एलसीबीच्या जाळ्यात चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या!

अहमदनगर दि. १२ जुलै (प्रतिनिधी) एटीएम फोडणारी टोळी एलसीबी अर्थात स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेत चार आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 09/07/2023 रोजी फिर्यादी प्रशांत अशोक साळवे वय 36, धंदा नोकरी शाखा प्रबंधक बॅक ऑफ महाराष्ट्र वाकोडी फाटा, अहमदनगर यांचे बॅक ऑफ महाराष्ट्र वाकोडी फाटा येथील एटीएम जवळ दोन अनोळखी इसमांनी त्यांचेकडील विना नंबर कारमध्ये सिल्व्हर रंगाची मारुती सुझूकी कंपनीची स्विफ्ट कारमध्ये येवुन गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन कट करुन मशिनमधील पैसे चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे. सदर घटने बाबत फिर्यादी यांचे तक्रारी वरुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गु.र.नं. 426/2023 भादविक 379, 511, 427 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर घटना घडल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. राकेश ओला साहेब, यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री. दिनेश आहेर, यांना गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशा प्रमाणे पोनि/श्री. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोसई/तुषार धाकराव, सोपान गोरे, सफौ/बाळासाहेब मुळीक, अतुल लोटके, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोना/रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, संदीप दरदंले, भिमराज खर्से, गणेश भिंगारदे, फुरकान शेख, पोकॉ/सागर ससाणे, मच्छिंद्र बर्डे, अमृत आढाव, बाळु गुंजाळ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, सफौ/भाऊसाहेब काळे, पोहेकॉ/बबन मखरे, पोना/ज्ञानेश्वर शिंदे, चापोहेकॉ/संभाजी कोतकर व अरुण मोरे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन पथके नेमुण गुन्हा उघडकिस आणणे बाबत सुचना देवुन पथकास तात्काळ रवाना केले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी बॅक ऑफ महाराष्ट्रा येथील सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्लेषणाचे आधारे गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशिन कट करुन चोरी करणारे रेकॉर्ड वरील आरोपींचा राहुरी परिसरात शोध घेताना पथकास एक सिल्व्हर रंगाची स्विफ्ट कार भरधाव वेगाने जाताना दिसली. पथकाने लागलीच संशयीत भरधाव कारची माहिती पोनि/श्री. दिनेश आहेर यांना कळविले. पोनि/श्री. आहेर यांनी पथकास सदर कारचा पाठलाग करण्यास सांगितले व दुसरे पथकास नगर मनमाड रोडने जावुन कारचा शोध घेणे बाबत कळविले. पथक एमआयडीसी, विळद परिसरात संशयीत वाहनाचा शोध घेताना सदर वाहन बायपास रोडने जाताना दिसले. पथकाने खातगांव टाकळी गांवचे शिवारात ताब्यातील वाहन स्विफ्ट कारला आडवे लावुन थांबबली व कार मधील दोन संशयीतांना पोलीस पथकाची ओळख सांगुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांची नावे 1) अजित अरुण ठोसर वय 22, रा. मातकुळी, ता. आष्टी, जिल्हा बीड हल्ली रा. पंम्पींग स्टेशन, साईनगर, ता. संगमनेर व 2) जमीर जाफर पठाण वय 21, रा. खांडगांव, ता. संगमनेर असे सांगितले. पंचासमक्ष त्यांचे कारची झडती घेता कारमध्ये ऑक्सीजन सिलेंडर, भारतगॅस कंपनीची टाकी, पेंट स्प्रे, गॉगल, स्टील रॉड, निळे व लाल रंगाचा पाईप, रेग्युलेटर, नोझल, ऍ़डजस्टेबल पक्कड व ओप्पो कंपनीचा मोबाईल मिळुन आल्याने त्या बाबत विचारपुस करता सुरुवातीस ते उडवा उडवीची उत्तरे देवु लागले. त्यांना विश्वासात घेवुन सखोल व बारकाईने विचारपुस करता त्यांनी त्यांचे साथीदार नामे रविंद्र चव्हाण व शुभम मंजुळे दोन्ही रा. खडकी, ता. कोपरगांव यांचे सोबत मिळुन चोरी केल्याची माहिती दिल्याने त्यांना ताब्यात घेतले व आरोपींचे साथीदाराचा शोध घेता ते मिळुन आल्याने त्यांना ताब्यात घेवुन त्यांचे नाव गांव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव 3) रविंद्र वाल्मिक चव्हाण वय 32, 4) शुभम पोपटराव मंजुळे वय 25 दोन्ही रा. खडकी, ता. कोपरगांव असे असल्याचे सांगितले.
ताब्यात घेतलेल्या चारही आरोपीस आणखी कोठे कोठे व किती ठिकाणी चोरीचे गुन्हे केले याबाबत विचारपुस करता त्यांनी भिंगार, राहुरी जिल्हा अहमदनगर वैजापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर, सातारा, जिल्हा छत्रपती संभाजीनगर व अंभोरा, जिल्हा बीड परिसरात चोरी केल्याची कबुली दिल्याने अहमदनगर बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता 1) भिंगार गु.र.नं. 414/23 भादविक 379, 2) भिंगार गु.र.नं. 426/23 भादविक 379, 511, 427, 3) राहुरी गु.र.नं. 745/23 भादविक 394, 504, 34, 4) वैजापुर, छत्रपती संभाजीनगर गु.र.नं. 363/23 भादविक 379, 5) सातारा, छत्रपती संभाजीनगर गु.र.नं. 204/23 भादविक 379 व 5) अंभोरा, जिल्हा बीड गु.र.नं. 25/23 भादविक 379 प्रमाणे दाखल एकुण -6 गुन्हे उघडकिस आले आहेत.
आरोपी अजित ऊर्फ कमळ्या अरुण ठोसर हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द संगमनेर शहर पोलीस स्टेशन येथे दरोडा, दरोडा तयारी, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे 11 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. संगमनेर शहर गु.र.नं. 2022/20 भादविक 379
2. संगमनेर शहर गु.र.नं. 170/21 भादविक 399,402
3. संगमनेर शहर गु.र.नं. 55/21 भादविक 379
4. संगमनेर शहर गु.र.नं. 59/21 भादविक 379, 34
5. संगमनेर शहर गु.र.नं. 107/21 भादविक 395, 120 (ब)
6. संगमनेर शहर गु.र.नं. 407/21 भादविक 392
7. संगमनेर शहर गु.र.नं. 20/22 भादविक 379, 34
8. संगमनेर शहर गु.र.नं. 167/22 भादविक 379
9. संगमनेर शहर गु.र.नं. 132/22 भादविक 379
10. संगमनेर शहर गु.र.नं. 49/22 भादविक 379
11. संगमनेर शहर गु.र.नं. 63/22 भादविक 379
आरोपी न
रविंद्र वाल्मीक चव्हाण हा सराईत गुन्हेगार असुन त्यांचे विरुध्द अहमदनगर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर येथे दरोडा, जबरी चोरी व चोरी असे गंभीर स्वरुपाचे 16 गुन्हे दाखल आहेत ते खालील प्रमाणे
अ.क्र. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1. कोपरगांव तालुका गु.र.नं. 51/14 भादविक 379, 34
2. कोपरगांव शहर गु.र.नं. 151/16 भादविक 392, 341
3. शिलेगांव, छत्रपती संभाजीनगर गु.र.नं. 227/16 भादविक 395
4. मनमाड शहर, नाशिक गु.र.नं. 45/17 भादविक 379
5. नगर तालुका गु.र.नं. 63/17 भादविक 379, 34
6. मनमाड शहर, नाशिक गु.र.नं. 140/18 भादविक 395
7. शिऊर, छत्रपती संभाजीनगर गु.र.नं. 45/18 भादविक 379, 34
8. वैजापुर, छत्रपती संभाजीनगर गु.र.नं. 78/18 भादविक 379, 34
9. कोपरगांव शहर गु.र.नं. 237/18 भादविक 379
10. कोपरगांव शहर गु.र.नं. 239/18 भादविक 379, 34
11. कोपरगांव शहर गु.र.नं. 217/18 भादविक 379, 34
12. पंचवटी, नाशिक गु.र.नं. 80/19 भादविक 379, 34
13. म्हसरुळ, नाशिक गु.र.नं. 8/19 भादविक 379, 34
14. पंचवटी, नाशिक गु.र.नं. 116/19 भादविक 379, 34
15. कोपरगांव शहर गु.र.नं. 48/19 भादविक 379, 34
16. कोपरगांव शहर गु.र.नं. 136/22 भादविक 379
ताब्यात घेतलेल्या चारही आरोपींचे कब्जातुन 18,16,500/- रुपये किंमतीची दोन मंहिंद्रा ट्रॅक्टर, एक स्विफ्ट कार, एक बुलेट, एक पल्सर मोटार सायकल व चोरीसाठी आवश्यक साधने अशा मुद्देमालासह ताब्यात घेवुन भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे हजर केले आहे. पुढील तपास भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन करीत आहे.
सदर कारवाई मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधीक्षक, अहमदनगर व मा. श्रीमती. स्वाती भोर मॅडम, अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपूर व मा. श्री. अनिल कातकाडे साहेब, उविपोअ, नगर शहर विभाग व मा. श्री.संदीप मिटके साहेब, उविपोअ, शिर्डी विभाग, अति. प्रभार श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.