साहित्यिक

सरपंच,पाटील, मराठी चित्रपटातील या भूमिका अजरामर करणारे,नायक,खलनायक आपल्या कुशल अभिनयातून समाज मनावर ठसा उमटविणारे मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते निळू फुले यांचा स्मृतिदिन विशेष!

निळू फुले (४ एप्रिल, १९३० – जुलै १३, २००९) हे मराठी रंगभूमी व चित्रपट क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत अभिनेते होते. कथा अकलेच्या कांद्याची या लोकनाट्याद्वारे पदार्पण केले. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीसाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती सोबत केले.
प्रमुख नाटके:
सखाराम बाईंडर
प्रमुख चित्रपट
सामना , पिंजरा
निळू फुले यांचा जन्म १९३० मध्ये पुणे येथे झाला. त्यांचे वडील लोखंड आणि भाजी विकून मिळणाऱ्या पैशावर चरितार्थ चालवत असत. निळू फुलेंनी मॅट्रिकपर्यंतच शिक्षण घेतले. पण, आपली अभिनयाची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांनी स्वतः ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’ हा वग लिहिला. त्यानंतर पु. ल.. देशपांडे यांच्या नाटकात ‘रोंगे’ची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. मात्र ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते कलाकार म्हणून खऱ्या अर्थाने पुढे आले.
नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रात निळूभाऊंनी स्वतःचा ठसा उमटवला. नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिका करणाऱ्या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक होते. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खुबीने उपयोग केला. सहज सुंदर अभिनय करणाऱ्या निळूभाऊंनी काल्पनिक कथेतला कलाकार जिवंत केला.
नाट्य रसिक आणि सिने प्रेमींना कलाकार म्हणून अत्यंत प्रिय असलेले निळू भाऊ समाजवादी विचारधारेशी जोडलेले होते. निळूभाऊंनी राष्ट्र सेवा दलाचा कार्यकर्ता म्हणून समाजाची सेवा केलेली आहे. ते समाजवादी विचारवंत नेते डॉ राम मनोहर लोहिया यांच्या विचाराने प्रेरित होते. त्यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती संघटनेसाठी अंधश्रद्धा विरोधी प्रबोधन, सत्याग्रह, आंदोलनात सक्रीय सहभाग दिला आहे. स्वातंत्र्यासाठी आणि स्वातंत्र्या नंतरही पिढी घडविणारी राष्ट्रीय संघटना असलेल्या राष्ट्र सेवा दलाच्या कला पथकाचे सदस्य राहिलेले निळू फुले यांनी १९५८च्या सुमारास पुण्यातील कला पथकाचे नेतृत्व केले .
निळू फुले यांचे जुलै १३, २००९ रोजी पहाटे दोनच्या सुमारास निधन झाले. अन्ननलिकेच्या कर्करोगाने अंथरुणाला खिळून असलेल्या निळू फुले यांची प्रकृती खालावल्याने त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.

कारकीर्द:
निळू फुले यांनी ‘कथा अकलेच्या कांद्याची’ या लोकनाट्याद्वारे रंगमंचावर पदार्पण केले. ‘एक गाव बारा भानगडी’ या चित्रपटातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले, आणि सलग ४० वर्षे या चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर कारकीर्द केली. निळू फुले यांनी १२ हिंदी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत, तर मराठी भाषेतल्या जवळपास १४० चित्रपटांमधून काम केले आहे. त्यांच्या भूमिकांपैकी ‘चोरीचा मामला’, ‘पुढचं पाऊल’, ‘शापित’, ‘सामना’, ‘सिंहासन’ यांतील भूमिका विशेष गाजल्या.

गाजलेली लोकनाट्ये:
कथा अकलेच्या कांद्याची, कुणाचा कुणाला मेळ नाही, पुढारी पाहिजे, बिन बियाचे झाड, मी लाडाची मैना तुमची, राजकारण गेलं चुलीत, लवंगी मिरची कोल्हापूरची, वगैरे.

गाजलेले मराठी चित्रपट:
अजब तुझे सरकार ,
आई ,
आघात
आयत्या बिळावर नागोबा
एक गाव बारा भानगडी
एक रात्र मंतरलेली
एक होता विदुषक
कडकलक्ष्मी
कळत नकळत
गणानं घुंगरू हरवलं
गल्ली ते दिल्ली
चटक चांदणी
चांडाळ चौकडी
चोरीचा मामला
हरहुन्नरी मराठी चित्रपट अभिनेते निळू फुले यांना देशस्तंभ न्यूज नेटवर्क परिवाराच्या वतीने स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन!

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे