सामाजिक

वडील हा कुटुंबाचा कणा असतो – श्रीनिवास बोज्जा किड्स सेकंड होम स्कुल मध्ये फादर्स डे साजरा

अहमद दि. १९ जून (प्रतिनिधी) – प. पु. माताजी श्री निर्मलादेवी प्रणित विश्व निर्मल फौंडेशन संचलित किड्स सेकंड होम प्री प्रायमरी स्कुल मध्ये फादर्स डे साजरा करते वेळी उदघाटन प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा, डॉ. दत्तात्रय भोंडवे, सहजयोगी मेजर कुंडलिक ढाकणे, संस्थेचे कोशाध्यक्ष संदीप गांगर्डे मुख्याध्यापिका सौ. दीपिका कदम, उपमुख्याध्यापिका सौ. संगीता गांगडे, शुभम भालदंड सर, प्रवीण वाघमारे सर हे उपस्थित होते.
या वेळी उदघाटन प्रसंगी बोलतांना संस्थेचे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा म्हणाले वडील हा कुटुंबाचा कणा असतो. वडीलधारी माणसं घरात नसली तर ते घर असुरक्षित असते. त्या घराला रौनक नसते. वडील हाच कुटुंबाला संकटातून वाचू शकतो म्हणून वडील बद्दल कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आत्मीयता असली पाहिजे.

या वेळी डॉ. भोंडवे यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले मदर्स डे सारखे फादर्स डे साजरा होणे काळाची गरज असून या शाळे मध्ये मुलांना आपले मुलं आहेत असे समजून शिक्षण दिले जाते त्या मुळे पालकांनीही आपली जबाबदारी समजून मुलाकडे लक्ष द्यावे.

या वेळी मेजर ढाकणे म्हणाले वडील हा कुटुंबाचा प्रमुख असतो, तो काबाडष्ट करून कुटुंबाची देखभाल करतो म्हणून प्रत्येकाने आपल्या वडिलांचा मान सन्मान करावा. या शाळेत शिक्षण बरोबर अध्यात्मिक शिक्षणही दिले जाते त्यामुळे विदयार्थ्यांना संतुलित जीवन जगण्यास व अभ्यासात मदत होते.

कार्यक्रमाचे सुरुवातीस प. पु. माताजी श्री निर्मला देवी यांचे पूजन करण्यात आले. शाळेतील विदयार्थ्यांनी फादर्स डे बद्दल आपले मनोगत इंग्रजी मध्ये केले. या वेळी लहान मुलांनी पापा ओ पापा या गाण्यावर सुंदर असे नृत्य केले. त्यानंतर काही पालकांनी आपले मनोगत व्यक्त केले. या वेळी शाळेचे मुख्याध्यापक सौ. दीपिका कदम यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले.कार्यक्रमाला शाळेच्या रुपाली जोशी, नजन वैष्णवी, आचल नेटके, दीपाली वाघुंडे, अन्वर सय्यद या शिक्षकांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. दीपाली हजारे यांनी केले तर आभारप्रदर्शन सौ. आचल नेटके यांनी मानले या कार्यक्रमास विदयार्थ्यांचे पालक बिल्डर प्रशांत शिरसाठ, तुषार वाकळे निलेश आव्हाड, संदीप कोरडे, गौतम सातपुते प्रोफे.मरकड सर, अक्षय कदम, राहुल उजागरे, किरण क्षीरसागर, कजबे साहेब, गणेश गुंड, अन्कुश कार्ले साहेब, जितेंद्र निमसे, महेश येणारे, शिवाजी कोलते, रोहिदास पवार, ज्ञानेश्वर आरडे, विशाल जगताप, दीपक लोमटे, रामदास इथापे, वैभव राऊत लक्ष्मी हिवरकर आदी पालक
उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे