कौतुकास्पद

विक्री करता आणलेला 13 लाख 70 हजार रुपयांचा गांजा स्थानिक गुन्हे शाखेने पकडला

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर: दि. 26 सप्टेंबर: विक्री करता आणलेला 13 लाख 70 हजार रुपयांचा चा गांजा पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. याबाबतची अधिक माहिती अशी कि
जिल्हा घटकामध्ये मा.श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी अंमली पदार्थ विरोधी विशेष मोहिम राबविणेबाबत आदेश दिलेले आहेत.
सदर आदेशानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी तथा पोनि.श्री.किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी शेवगांव उपविभाग हद्दीतील अंमली पदार्थ विक्री व सेवन करणारे इसमांची माहिती काढुन कारवाई करणेबाबत पोउपनि/ अनंत सालगुडे, पोहेकॉ/ अतुल लोटके, पोहेकॉ/ संतोष खैरे, पोना/ बाळासाहेब नागरगोजे, पोना/ सोमनाथ झांबरे, पोकॉ/ किशोर शिरसाठ यांना रवाना केले. सदर पथक हे पाथर्डी पो.ठाणे हद्दीत अंमलीपदार्थाबाबत माहिती घेत असतांना, पथकांस गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, इसम नामे 1) सतिष सुरेश डोळस रा. मावळ, पुणे, 2) राकेश सुदाम वाळुंज रा. मावळ, ता. पुणे, 3) आकाश देविदास जंगम रा. कामशेत, पुणे, 4) सतिष कृष्णकुमार बिडलांग रा. कारला, मावळ, पुणे हे त्यांचेकडील काळे रंगाची स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम.एच. 12 जे. झेड 1854 ही मधुन इसम नामे 5) सुरज आसराजी छाजेड रा. बालमटाकळी, शेवगांव याचेकडुन अंमली पदार्थ गांजा खरेदी करुन विक्री करिता शेवगांव येथुन पाथर्डी मार्गे पुणे परिसरामध्ये जाणार असल्याची माहिती मिळाली. त्यावेळी सदर बातमीची हकीगत मा. पोनि श्री कबाडी सो, यांना कळविली असता त्यांनी पाथर्डी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे मदतीने कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. त्यानुसार पथकाने तात्काळ पाथर्डी पोलीस ठाणे येथे येवुन पोनि श्री पुजारी यांना मिळालेल्या बातमीचा लेखी रिपोर्ट दिला असता, त्यांनुसार पोउपनि/महादेव गुट्टे, पोकॉ/277 इजाज महेबुब सय्यद, पोहेकॉ/1309 अल्ताफ अहमद शेख, नेम. पाथर्डी पोलीस ठाणे अशांनासह कारवाई करण्याकरीता आवश्यकत्या साहित्यासह पोलीस स्टेशन मधुन सरकारी व खाजगी वाहनाने निघुन पाथर्डी ते शेवगांव जाणारे रोडवरील माळी बाभुळगांव फाटा या ठिकाणी सापळा रचुन कारवाई बातमीतील नमुद काळे रंगाची स्कॉर्पीओ गाडी क्रमांक एम.एच. 12 जे झेड 1854 ताब्यात घेतली, नमुद स्कॉर्पीओ मध्ये 04 इसम यांना पोलीस स्टाफ, पंचाची ओळख समजावुन सांगुन त्यांना त्यांचे नांव, गांव विचारता त्यांनी त्यांची नावे 1) सतिष सुरेश डोळस वय 27 वर्षे, रा. कान्हेफाटा, इकोव्हॅली सोसायटी, सी 505, मावळ, ता. मावळ, जि. पुणे, 2) राकेश सुदाम वाळुंज वय – 35 वर्षे, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे, 3) आकाश देविदास जंगम वय – 29 वर्षे, रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे, 4) सतिष कृष्णकुमार बिडलांग वय – 33 वर्षे, रा. कारला, ता. मावळ. जि. पुणे असे असल्याचे सांगितले. इसमांचे ताब्यातील स्कॉर्पीओ गाडीची झडती घेता सदर गाडीचे पाठीमागील डिकीमध्ये निळे रंगाची ट्रॅव्हल बॅग मिळुन आली. सदर बॅग उघडुन पाहाता आतमध्ये दोन मोठ्या प्लॅस्टीक पिशव्यामध्ये उग्र वास येत असलेला व मिश्रीत असलेला हिरवट रंगाचा पाला, फुले, बोंडे काड्या संलग्न असलेले कॅनबिस वनस्पतीचे शेंडे (अंमली पदार्थ गांजा) मिळुन आला. विचारणा केली असता, इसम नामे सतिष सुरेश डोळस यांने तो गांजा हा अंमली पदार्थ असल्याचे सांगुन तो नशेसाठी वापरला जातो व सदरचा गांजा हा इसम नामे 5) सुरज आसराजी छाजेड रा. बालमटाकळी, शेवगांव, जि. अहिल्यानगर यांचेकडून खरेदी करुन, वरिल आरोपी 1) ते 4) यांनी विक्रीकरीता आणलेला असल्याचे सांगितले. नमुद आरोपी ताब्यात घेवुन, आरोपींकडून एकूण 13,70,500/- रुपये किमंतीचा अंमली पदार्थ गांजा व वाहन जप्त करण्यात आले आहे.
ताब्यातील आरोपी नामे 1) सतिष सुरेश डोळस वय 27 वर्षे, रा. कान्हेफाटा, इकोव्हॅली सोसायटी, सी 505, मावळ, ता. मावळ, जि. पुणे, 2) राकेश सुदाम वाळुंज वय – 35 वर्षे, रा. इंद्रायणी कॉलनी, कामशेत, ता. मावळ, जि. पुणे, 3) आकाश देविदास जंगम वय – 29 वर्षे, रा. कामशेत, ता. मावळ, जि. पुणे, 4) सतिष कृष्णकुमार बिडलांग वय – 33 वर्षे, रा. कारला, ता. मावळ. जि. पुणे, 5) सुरज आसराजी छाजेड रा. बालमटाकळी, शेवगांव, जि. अहिल्यानगर (फरार) यांचे विरुध्द स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ बाळासाहेब सुभाष खेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन पाथर्डी पो.ठाणे, अहिल्यानगर येथे गु.र.नं. 1103/2025 गुंगीकारक औषधीद्रव्ये आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ कायदा सन 1985 चे कलम 8 (क),20(ब), ii(ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपी क्र. 1 ते 4 आणि गुन्हयात एकूण 13,70,500/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पाथर्डी पो.ठाणे यांचे ताब्यात देण्यात आले असून, पुढील तपास पाथर्डी पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई श्री.सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, श्री. वैभव कलुबर्मे, अपर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, श्री. निरज राजगुरु, उपविभागीय पोलीस अधिकारी, शेवगांव उपविभाग, जि. अहिल्यानगर, श्री. किरणकुमार कबाडी, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर आणि श्री. विलास पुजारी, पोलीस निरीक्षक, पाथर्डी पो.ठाणे यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे आणि पाथर्डी पो.ठाणेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे