सामाजिक

शिक्षण संचालक(प्रा) यांना वंचित बहुजन आघाडीचे निवेदन शैक्षणिक वर्षाच्या आरटीई ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ मिळावी: योगेश साठे

सन २०२३ -२४ या शैक्षणिक वर्षाच्या शिक्षण हक्क अधिनियमानुसार दुर्बल व वंचित घटकातील २५% ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत मुदतवाढ मिळावी यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा महासचिव योगेश साठे यांच्यासह वडगाव गुप्ता शाखेचे अध्यक्ष दीपक चांदणे,भाऊसाहेब निकम उपस्थितीत शिक्षणाधिकारी(प्रा) यांना निवेदन देण्यात यावे.
दरवर्षी प्रमाणे सन २०२३-२०२४ या वर्षीची आरटीई २५% प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येत असून या प्रवेश प्रक्रियाअंतर्गत दिनांक २५ एप्रिल २०२३ या तारखे पर्यंत शेवटची मुदत असल्याने पालकांना ऑनलाईन अर्ज भरण्यास मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहे.सध्या वातावरणात वारा वादळ सह अवकाळी पावसामुळे तांत्रिक अडचणीनासुद्धा निर्माण होत आहे,खेडोपाडी ऑनलाईन सर्व्हर लाईट नसल्यामुळे बंद राहते, तसेच सर्व्हर सतत डाऊन असल्याकारणाने सदर अर्ज भरण्यास अनेक अडीअडचणीला पालकांना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे खेडोपाडी ऑनलाईन अर्ज रात्र रात्र भर अर्ज भरण्यास विलंब होत आहे त्यामुळे दुर्बल व वंचित घटकांतील असंख्य मुलेमुली हे त्यांच्या हक्काच्या शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून दुर्बल व वंचित घटकांतील मुलामुलींना त्यांच्या हक्काचे शिक्षण मिळावे यासाठी आपण शासनस्तरावर लवकरात लवकर निर्णय घेऊन या आरटीई ऑनलाईन अर्ज प्रवेश प्रक्रियेची मुदत करावी अशी मागणी केली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे