मिरजगाव मध्ये रमजान ईद निमित्त शीरखुर्मा पार्टी उत्साहात!

मिरजगाव दि. २४ एप्रिल( प्रतिनिधी):- मिरजगाव मध्ये रमजान ईद निमित्त सामाजिक सलोखा जपत. सर्व ग्रामस्थांसाठी शीरखुर्मा पार्टीचे समस्त मुस्लिम बांधव सवाबे जरिया फाउंडेशन च्या वतीने जामा मस्जिद येते आयोजन करण्यात आले होते. अतिशय उत्साहात शिरखुर्मा पार्टी पार पडली. सर्व हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमा वेळी आलेल्या सर्व सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान केला गेला.
प्रसंगी उपस्थित मान्यवर. नंदकुमार वीरपाटील, शाहरुख सय्यद, विशाल बाबर, ग्रा.पं सदस्य सागर पावळ,शिवाजी गायकवाड,अक्षय वहील, नंदकुमार बावडकर, मुदस्सर शेख, ग्रा.पं सदस्य सलीम आतार, सादिक शेख, जाकिर शेख. आदि मान्यवर उपस्थित होते. सध्याच्या धर्मांधाच्या दूषित वातावरणामध्ये आजही हिंदू मुस्लिम बांधव एक आहेत याचा सार्थ अभिमान आहे. कार्यक्रमांमध्ये सर्वांना एकत्र पाहून दोस्ती चित्रपटातील आनंद बक्षी यांनी लिहिलेल्या गाण्याच्या दोन ओळी मात्र नक्की आठवल्या.
बने चाहे दुश्मन जमाना हमारा सलामत रहे दोस्ताना हमारा.
या वेळी एन.डी पाटील फ्रेंड सर्कल व वीर राजे ग्रुप यांचा सत्कार करण्यात आला.