कौतुकास्पद

प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र, अहिल्यानगरच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर :
सहकार महर्षी व सहकारी कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त, प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र, अहिल्यानगर यांच्या मागील तीन महिन्यांतील कार्याचा गौरव करून विशेष सन्मान करण्यात आला.
मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाऊंडेशन येथे, सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय, भारत सरकार यांच्या अंतर्गत प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र मे २०२५ मध्ये सुरू करण्यात आले.
या केंद्राच्या माध्यमातून दररोज दिव्यांग तसेच ६० वर्षांवरील वयोवृद्ध लाभार्थ्यांना विविध प्रकारची मोफत सहायक साधने वितरित केली जात आहेत. देशभरात अशाप्रकारची एकूण ७५ दिव्याशा केंद्रे कृत्रिम अवयव व अंग निर्माण निगम (अलिमको), कानपूर यांच्या सहकार्याने कार्यरत आहेत.
त्यापैकी अहिल्यानगर केंद्राने अल्पावधीतच उत्कृष्ट कामगिरी करून अव्वल स्थान पटकावले आहे. मे ते जुलै २०२५ या अवघ्या तीन महिन्यांच्या कालावधीत या केंद्रामार्फत १९०५ दिव्यांग व वयोवृद्ध लाभार्थ्यांना १.३३ कोटी रुपयांची सहायक साधने वाटप करण्यात आली. यामध्ये फक्त अहिल्यानगर जिल्ह्यातीलच नव्हे तर वाशीम, बीड, जालना, नाशिक, संभाजीनगर आणि पुणे जिल्ह्यातील लाभार्थ्यांचाही समावेश आहे.
या उल्लेखनीय कार्याबद्दल मा. प्रा. डॉ. नितीन गंगणे, कुलगुरु, के. एल. ई. अभिमत विद्यापीठ, बेळगाव यांच्या हस्ते श्री. सृजन भालेराव (अलिमको, कानपूर) व त्यांच्या टीमचा विशेष पुरस्कार व सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी मा. सौ. शालिनीताई विखे पाटील, अध्यक्षा, जिल्हा परिषद अहिल्यानगर; मा. प्रा. डॉ. पांडुरंग गायकवाड, सेक्रेटरी जनरल; मा. श्री. वसंतराव कापरे, विश्वस्त; मा. श्री. उत्तमराव कदम; श्री. सुभाष पाटील भदगले; श्री. सुनील कल्हापुरे, संचालक (तांत्रिक); मा. प्रा. डॉ. आर. के. पडळकर तसेच मा. प्रा. डॉ. अभिजित दिवटे, संचालक (वैद्यकीय) व संचालक, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, अहिल्यानगर उपस्थित होते.
प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र, अहिल्यानगरने केलेली ही कामगिरी फाऊंडेशनसाठी अभिमानाची बाब ठरली असून, यामुळे दिव्यांग व वयोवृद्ध लाभार्थ्यांना आत्मनिर्भर जीवन जगण्यासाठी मोलाची मदत मिळाली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे