सामाजिक

प्रेम म्हणजे प्रेम असतं.. मग सर्वांचं सेम का नसतं?

*- भाग 1

एकतर्फी प्रेम किंवा ब्रेकअप झाल्या नंतर त्याच व्यक्तीला दुखावणे,ईजा करणे,थेट संपविणे किंवा आत्महत्या करणे या घटना मन सुन्न करून जातात.*

याला खरंच प्रेम च म्हणायचे का?

एखादी व्यक्ती आवडली म्हणून ती आपल्या आयुष्यात असावी,भविष्यातील जोडीदार म्हणून असावी असे वाटणे सहाजिकच आहे.
आवडणाऱ्या त्या व्यक्ती बद्दल आकर्षण,आपुलकी निर्माण व्हायला लागते मग त्याला प्रेम हे नाव दिले जाते.

परंतु…
*” तू मेरी नही तो किसी और की भी नही हो सकती…..”*
याला प्रेम म्हणायचे का?
समोरच्या व्यक्तीने नकार दिला म्हणून ज्या व्यक्तीवर आपण प्रेम? करत होतो,त्याला इजा करण्याचा विचार मनात येत असेल तर आपण ज्याला प्रेम म्हणतो ते नक्की प्रेमच आहे की अजून काही?
म्हणूनच असे वाटते की एखाद्याबद्दल *over-possesive म्हणजेच मालकी अधिकार गाजविणे*
हे प्रेमाचे लक्षण असू शकते का?
प्रेम हे आदर,आपुलकी,आत्मीयता,त्याग यांनी भरलेले असते.
जिथे आपल्या प्रेमाच्या व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही याची काळजी घेतली जाते, तिथे त्या व्यक्तीला साधे नुकसान करण्याचा विचार देखील मनाला स्पर्श करणार नाही.
खरे तर हा आदर,आत्मीयता,जिव्हाळा असेल तरच त्याला प्रेम म्हणावे.
या विरुद्ध असेही काही मुलं/मुली असतात,ज्यांना एखाद्या व्यक्ती बद्दल प्रेम वाटत असते पण भविष्यात येणाऱ्या अडीअडचणीचा आधीच विचार करतात आणि त्या व्यक्तीला आपल्यामुळे काही त्रास होणार नाही त्यानुसार पाऊल उचलतात.काही जण तर आपले प्रेम व्यक्त ही करत नाहीत किंवा व्यक्त जरी केले तरी त्या बदल्यात परत प्रेमंच मिळावे अशी अपेक्षा ही करत नाही.
आणि आत्महत्याही करत नाहीत.
याला खरे प्रेम म्हणता येईल.
अशा ही काही केसेस बघायला मिळतात जिथे दोघांचे ही मनोमिलन झालेले असते परंतु काही काळानंतर लक्षात येते की आता एकमेकांशी पटत नाही.मतमतांतरे असल्याने,स्वभावातील वेगळे पणा मुळे किंवा इतर काही कारणामुळे एकमेकांबद्दल असलेला जिव्हाळा कमी होत आहे आणि नात्यांमध्ये दुरावा निर्माण होत आहे.अशा वेळी प्रेमाचे रूपांतर लग्न करून आयुष्यभर भांडणे करत घालविण्यापेक्षा योग्य वेळी मागे फिरलेले कधीही चांगलेच.
अशा वेळी दोघांपैकी एकाची तयारी नसू शकते आणि पुढे एकाच्या हट्टी/दुराग्रही वागण्यामुळे,समोरच्याला समजून न घेतल्यामुळे दोघांनाही त्रास होऊ शकतो.मग तो/ती किती टोकाची भूमिका घेतो/घेते हे सांगता येत नाही.
एकमेकांवर खरेच प्रेम असेल तर तिथे एकमेकांचा आदर केला जातो आणि म्हणून त्या व्यक्तीच्या मताचाही आदर केला जात असेल तरच त्याला प्रेम म्हणावे ..नाही का?

*नकार किंवा अपयश पचविता येणे यासाठी सुद्धा मनाचा मोठेपणा,विचारांची परिपक्वता तसेच संस्कार(नैतिक मूल्ये) हवे असतात*
*आयुष्यात सर्व काही आपल्या मनाप्रमाणेच घडेल,असे नेहमीच शक्य नसते,म्हणून आयुष्य जसे आहे तसे स्विकारायला हवे.*

*प्रेम करावे पण…*
*जीवापाड प्रेमाच्या नावाखाली मालकी अधिकार गाजवून एखाद्याच्या जीवाशी खेळू नये.*
*आनंदाने जगावे व दुसऱ्याला आनंदाने जगू द्यावे.*

*©डॉ.सचिन साळवे*
*समुपदेशक,सायकोलॉजीस्ट*
*मनरंग कौन्सेलिंग सेंटर*
*अहमदनगर*
*9822291118*

(टोकाची भूमिका का घेतली जात असावी? काय काय मानसिक किंवा इतर कारणे असतात? आपल्या पार्टनर बद्दल पुढील धोका योग्य वेळी ओळखता येऊ शकतो का? ……हे सर्व पुढील भागात)

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे