कौतुकास्पद

शहर व जिल्हास्तरीय तायक्वांदो स्पर्धा संपन्न ‘एकलव्य’ने अनेक खेळाडू घडविले – नगरसेवक विजय पठारे

अहमदनगर दि.१५ डिसेंबर (प्रतिनिधी)- नगर शहर व उपनगरांत मागील अनेक वर्षांपासून एकलव्य तायक्वांदो ॲकॅडमी क्रीडा क्षेत्रात योगदान देत आहे ‘एकलव्य’ने आतापर्यंत अनेक खेळाडू घडविले आहेत. तायक्वांदो स्पर्धेत ‘एकलव्य’चा दबदबा कायम राहिला. पैसा हे ध्येय न ठेवता खेळाडू घडविण्याचे ध्येय ठेवून गोरगरीब व गरजवंतांना प्रसंगी मोफत प्रशिक्षण दिले. ‘एकलव्य’चे संचालक गणेश वंजारे यांनी संघर्ष करीत ॲकॅडमीची मुहूर्तमेढ रोवली. त्यांच्या संघर्षाचे फलित होऊन आज ‘एकलव्य’चा वेलू बहरला आहे, असे प्रतिपादन नगरसेवक विजय पठारे यांनी केले.
जिल्हास्तरीय व मनपाने घेतलेल्या तायक्वांदो स्पर्धेत ‘एकलव्य’च्या खेळाडूंनी आपला दबदबा कायम ठेवत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकाचे मानकरी ठरून विभागीय स्तरावर निवडलेल्या झालेल्या खेळाडूंच्या गुणगौरवप्रसंगी नगरसेवक विजय पठारे बोलत होते. यावेळी राजे प्रतिष्ठानचे अनिलराजे झिरपे, लेकराज सिंग, गणेश गोसावी, सिद्धूभाऊ कोतकर, प्रशिक्षक ग्रँडमास्टर अल्ताफ खान, मुख्य प्रशिक्षक गणेश वंजारे, योगेश बिचितकर, सचिन कोतकर, मंगेश आहेर, तेजस ढोबळे, सचिन मरकड, युवराज लोखंडे, मयूर अडागळे आदी उपस्थित होते.
श्री. अनिलराजे झिरपे म्हणाले की, सर्वसामान्य कुटुंबातील खेळाडूंसाठी झटणारी एकलव्य तायक्वांदो ॲकॅडमी समाजापुढे आदर्श असून, स्वतःचा वेगळा ठसा उमटवत आहे, ही कौतुकास्पद बाब आहे. भविष्यात प्रतिष्ठानच्या माध्यमातून नवीन खेळाडू पुढे यावेत, यासाठी ‘एकलव्य’चे मुख्य प्रशिक्षक गणेश वंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा आयोजित करणार असल्याचे सांगितले.
स्पर्धेत ‘एकलव्य’च्या खेळाडूंनी 21 सुवर्ण, 11 रौप्य 13 व कांस्य पदके पटकावत तायक्वांदो स्पर्धेत दबदबा कायम ठेवत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरले. सुवर्णपदकाचे प्रथमेश रोडे, अनिल लोंढे, प्रथमेश गर्जे, तनिष्क गोसावी, आशिष घुले, मच्छिंद्र चव्हाण, ओंकार शेंडे, तनोज किसरा, वनश्री लष्करे, अभिषेक सैनी, लकी बेरड, वसुधा कोंडकर, प्रियंका झिरपे, गौरी शिंदे, रोहन डोईफोडे, अक्षय डोईफोडे, अमोल जायभाय, प्रतीक शिंदे, अनुराधा वेदपाठक, मयुरी शिंदे, सोहम वाघमारे मानकरी ठरले.
रौप्य यशराज पाचारणे, तुषार कांबळे, शुभम लोंढे, शिवम चव्हाण, सार्थक देवकर, पियुष सहानी, ओंकार मिसाळ, संस्कृती क्षीरसागर, यश दाढवे, रूद्र आहेर, आदिश्री मोहिते, तर कांस्यचे शिवम दारकुंडे, राज कोतकर, आरती राऊत, फरान शेख, श्रेया पवार, संग्राम कोतकर, हिमांशू रोमन, वेेदांत बचाटे, सबा खान, निरंजन पवार, कार्तिक थोरे, आदिती बांगर हे मानकरी ठरले. या खेळाडूंची विभागीय स्तरासाठी निवड झाली.
या निवडीबद्दल या सर्व खेळाडूंचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, मुख्य प्रशिक्षक गणेश वंजारे, ग्रँडमास्टर अल्ताफ खान, ‘एकलव्य’चे प्रशिक्षक, शिक्षक व प्रमुख पाहुणे यांनी अभिनंदन करीत पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन योगेश बिचितकर यांनी केले. स्वागत गणेश वंजारे यांनी केले. आभार सचिन कोतकर यांनी मानले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे