पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा वाळू तस्करांना जोर का झटका! मुळा नदी पात्रामध्ये व राहुरी येथील तनपुरेवाडी येथे ७,३०,०००/ (सात लाख तीस हजार) किमतीचा वाळू व साहित्य मुद्देमालासह जप्त! स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांच्या पथकाची धडाकेबाज कामगिरी!

अहमदनगर १५ डिसेंबर(प्रतिनिधी)
पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचे आदेशाने राहुरी पोलीस स्टेशन हददीत अवैध धंदयावर कारवाई कामी पेट्रोलिंग करत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की तनपुरेवाडी रोड ता. राहुरी गावचे शिवारातील तनपुरेवाडी रोडने राहुरीचे दिशेन इसम नामे राजेंद्र गुंजाळ हा त्याचे कडील विटकरी रंगाचे टेम्पो मधुन शासकिय वाळुची चोरुन वाहतुक करीत आहे आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने .पोहेकॉ/८७२सुरेश चंद्रकांत माळी, पोना/ १७७२ लक्ष्मण चिंधु खोकले पोना/३७६ शंकर संपत चौधरी,पोना/१५१६ रविकिरण बाबुराव सोनटक्के,पोना/२५१४ रंजीत पोपट जाधव पोना / २२४ राहुल भाउसाहेब सोळंके, सर्व नेमणुक स्थानिक गुहे शाखा अ.नगर असे नमुद पोलीस स्टाफ खाजगी वाहनाने निघुन बातमीतील ठिकाणी तनपुरेवाडी रोडने जावुन राहिबाई मंदिराजवळ जावुन सापळा लावला असता तनपुरे वाडी रोडने राहुरीचे दिशेन एक विटकरी रंगाचा टॅम्पो येताना दिसला बातमी प्रमाणे खात्री पटताच ०३/३० वा सुमारास सदर टेम्पोच्या पाठीमागील हौदयामध्ये वाळु असल्याची खात्री झाल्याने सदर टेम्पो चालकास त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव १) राजेंद्र अर्जुन गुंजाळ वय २६ रा. मुलणमाथा, राहुरी बु ता. राहुरी जि.अ.नगर असे सांगितले. सदर चालकास वाळु वाहतुकीचा परवाना बाबत विचारपुस केली असता त्याने कुठल्याही प्रकारचा परवाना नसले बाबत सांगितले तसेच सदरचे टेम्पो मालका बाबत विचारपुस करता चालकाने सदर टेम्पोचा मालक मिच आहे असे सांगितले. सदर टेम्पो चालक/मालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशिरपणे वाळु चोरी करून पर्यावरणाचा -हास करुन वाहतुक करतांना मिळुन आला आहे. सदर टेम्पोची पाहणी करता त्याचे वर्णन खालील प्रमाणे
१४,००,०००/- रु कि.चा एक विना क्रमांकाचा टाटा कंपनीचा विटकरी रंगाचा ९०९ टेम्पो जु.वा. कि. अंदाजे २) २०,०००/- रु किमतीची ०२ ब्रास शासकिय वाळु कि.अं.
४,२०,०००/- एकुण
वरील वर्णनाची व किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष सदर टेम्पो व शासकिय वाळुचा पंचनामा पोहेकॉ / जायभाय यांनी जागीच लाईटचे उजेडात करुन वरील मुददेमाल जागीच जप्त करुन ताब्यात घेवुन आरोपी व मुददेमालासह पोलीस स्टेशनला आलो.
तरी दिनांक १३ / १२ / २०२२ रोजी ०३/ ३० वा सुमारास तनपुरेवाडी ता. राहुरी येथे राहिबई मंदीराजवळ तनपुरे वाडी रोडने टाटा कंपनीचा विना क्रमांकाचा विटकरी रंगाचा टेम्पो यावरील चालक १) राजेंद्र अर्जुन गुंजाळ वय २६ रा. मुलणमाथा, राहुरी बु ता. राहुरी जि.अ.नगर हा बेकायदेशिरपणे ०२ ब्रास शासकिय वाळुची चोरी करुन पर्यावरणाचा -हास करून वाहतुक करतांना मिळुन आला आहे त्याचे विरुध्द पोलीस नाईक लक्ष्मण चिंधू खोकले यांनी भादवि कलम ३७९ सह पर्यावण कायदा कलम ३.१५ प्रमाणे राहुरी पोलिसात फिर्याद दिली आहे.
*दुसरी कारवाई*
दि. १३/१२/२०२२
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाने राहुरी पोलीस स्टेशन हददीत अवैध धंदयावर कारवाई कामी पेट्रोलिंग करत असताना अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, डिग्रस ता. राहुरी गावचे शिवारातील मुळा नदी पात्रामध्ये एक इसम हा त्याचे कडील पांढरे रंगाची झेनॉन मधुन शासकिय वाळुची चोरुन वाहतुक करीत आहे आत्ता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथकातील कर्मचाऱ्यांनी आरोपी १) भिमराज गुलाब बर्डे वय २५ रा. बारागाव नांदुर ता राहुरी, जि. अ.नगर असे सांगितले. सदर चालकास वाळु वाहतुकीचा परवाना बाबत विचारपुस केली असता त्याने कुठल्याही प्रकारचा परवाना नसले बाबत सांगितले तसेच सदरचे झेनॉन मालका बाबत विचारपुस करता चालकाने सदर गाडीचा मालक मीच आहे असे सांगितले. सदर झेनॉन चालकाने शासनाची कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशिरपणे वाळु चोरी करुन पर्यावरणाचा -हास करुन वाहतुक करतांना मिळुन आला आहे. सदर झेनॉनची दोन पंचासमक्ष पाहणी करता त्याचे वर्णन खालील प्रमाणे
१) ३,००,०००/- रु. कि. ची एक विना क्रमांकाची पांढरे रंगाची झेनॉन गाडी तिचा चे.सी. क्र MAT५२४००५ESC०१५४६ असा असलेली जु.वा. कि. अंदाजे.
२)१०,०००/- रु किमतीची १ ब्रास शासकिय वाळु कि.अं.
३,१०,०००/- एकुण
वरील वर्णनाची व किमतीचा मुददेमाल मिळुन आल्याने दोन पंचासमक्ष सदर झेनॉन व शासकिय वाळुचा पंचनामा पोहेकॉ / जायभाय यांनी लाईटचे उजेडात जागीच करुन वरील मुददेमाल जागीच जप्त करुन ताब्यात घेवून आरोपी व मुददेमालासह पोलीस स्टेशनला आलो..
तरी दिनांक १३/१२/२०२२ रोजी ०२/०० वा सुमारास डिग्रस ता. राहुरी गावचे शिवारातील मुळा नदी पात्रामध्ये येथे विना क्रमांकाची पांढरे रंगाची झेनॉन यावरील चालक १) भिमराज गुलाब बर्डे वय २५ रा. बारागाव नांदुर ता राहुरी, जि. अ. नगर येथून नदी पात्रातून बेकायदेशिरपणे १ ब्रास शासकिय वाळुची चोरी करुन पर्यावरणाचा -हास करुन वाहतुक करतांना मिळुन आला आहे त्याचे विरुध्द पोलीस नाईक लक्ष्मण चिंधू खोकले यांनी भादवि कलम ३७९ आरोपी विरोधात फिर्याद देऊन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रताप दराडे हे करत आहेत.