कौडाने ग्रामपंचायत कार्यालयास चार दिवसापासून टाळे!ग्रामस्थांची गैरसोय!

कौडाने (प्रतिनिधी संभाजी शिंगाडे) कर्जत तालुक्यातील कौडाने ग्रामपंचायत कार्यालय गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याची माहिती समोर आली आहे.
साधारणपणे गावातील ग्रामपंचायत कार्यालय हे गावातील लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी असते.कोणत्याही कागदोपत्री कामासाठी जावे लागते.परंतु हेच कार्यालय गेल्या चार दिवसांपासून बंद असल्याने ग्रामस्थांची चांगलीच गैरसोय होत आहे. तसेच ग्रामपंचायत कार्यालय उघडण्याचे कोणतेही वेळापत्रक नसल्यामुळे आपल्या गावातील ग्रामपंचायतीला वाली आहे का नाही? अशा प्रश्नार्थक चर्चा व नाराजीचा सूर कौडाने गावातील ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. ग्रामंचायत कार्यालय कधी उघडते आहे.या आशाळभूत नजरेने नागरिक ग्रामपंचायत कार्यालयकडे पहात आहेत.
*****
मी माझ्या मुलाचा जन्माचा दाखला काढण्यासाठी गेल्या दोन दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयात चक्कर मारत आहेत.पण कार्यालय बंदच आहे. त्यामुळे मोठी गैरसोय होत आहे.
भाऊसाहेब शिंगाडे
ग्रामस्थ कौडाणे
पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या वैयक्तिक योजनांची चौकशी करण्याकरता गेलो असता ग्रामपंचायत कार्यालय बंद होते.
अनिल सूर्यवंशी
ग्रामस्थ कौडाणे