सात्रळ महाविद्यालयात निर्भय कन्या अभियानांतर्गत मुलींची स्वसंरक्षण कार्यशाळा संपन्न
राहुरी / प्रतिनिधी — सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व तालुक्यातील सात्रळ येथील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थी कल्याण मंडळांतर्गत महिला सबलीकरण कक्ष आयोजित निर्भय कन्या अभियान या उपक्रमांमध्ये मुलींसाठी एक दिवशी स्वसंरक्षण कार्यशाळा शुक्रवारी संपन्न झाली.
याप्रसंगी कराटे ब्लॅक बेल्ट प्राप्त तायकांदो मार्गदर्शक कु. सोनाली खोबरे यांनी सात्रळ महाविद्यालयातील विद्यार्थिनींना प्रात्यक्षिकासह स्वसंरक्षणाचे धडे दिले. खोबरे यांचे सहकारी साईनाथ वाकडे, पल्लवी कुलथे, हरीष मुसमाडे यांनीही विविध प्रात्यक्षिकामधून स्वसंरक्षण कसे करावे हे स्पष्टीकरणासह विद्यार्थिनींना सांगितले.
यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रोफेसर डॉ. सोमनाथ घोलप, उपप्राचार्य प्रा. दिपक घोलप, महाविद्यालयाचे उपप्राचार्य व विद्यार्थी कल्याण अधिकारी प्रा. दिनकर घाणे, शारीरिक शिक्षण संचालक प्रा. सुरेश आनाप, रासेयो कार्यक्रमाधिकारी प्रा. रोहित भडकवाड उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महिला सबलीकरण कक्षाच्या समन्वयक प्रा. लतिका पंडुरे, प्रा. शरयू दिघे, प्रा. स्वाती कडू, प्रा. दिप्ती आगरकर, प्रा. छाया पवार यांनी परिश्रम घेतले.