शिवसेना साधणार उपनगरांचा विकास – महापौर रोहिणीताई शेंडगे
नगरसेवक विजय पठारे यांच्या प्रयत्नातून भूषणनगरमधील नम्रता कॉलनीत सिमेंट रस्ता काँक्रिटीकरण पूर्ण

नगर(केडगाव प्रतिनिधी) – उपनगरातील विकासकामांचे श्रेय लाटण्याचा आतापर्यंत अनेकांनी प्रयत्न केला. जनतेची नियमितपणे दिशाभूल करून विकास केल्याचे भासविले. परंतु शिवसेनेने असे प्रकार कधीही केले नाहीत. ज्या ठिकाणी शिवसेनेने विकासकामे केली, त्याचेच लोकार्पण केले. शिवसेना नगरसेवक व लोकप्रतिनिधी नेहमी जनतेच्या संपर्कात राहून समस्या जाणून घेतात व त्यानुसार कामाचे नियोजन करतात. अशाप्रकारे काम केल्यास प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघतात. नगरसेवक विजय पठारे यांनी नम्रता कॉलनीत रस्त्याचे सिमेंट काँक्रिटीकरण करून येथील समस्या कायमस्वरूपी निकाली काढली. उपनगरातील शिवसेनेचे सर्व नगरसेवक विकासकामांसाठी लागणारा निधी उपलब्ध व्हावा, यासाठी आग्रही असतात. नुसते श्रेय लाटून विकास होत नसतो, त्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागते, असे प्रतिपादन महापौर रोहिणीताई शेंडगे यांनी केले.
शिवसेना नगरसेवक विजय पठारे यांच्या प्रयत्नातून केडगाव, भूषणनगरमधील नम्रता कॉलनीतील रस्ता काँक्रिटीकरण लोकार्पणप्रसंगी महापौर रोहिणीताई शेंडगे बोलत होत्या. याप्रसंगी शिवसेना माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक विजय पठारे, नगरसेवक अमोल येवले, संग्राम कोतकर, उपशहरप्रमुख अविनाश मेहेर, डॉ. श्रीकांत चेमटे, गोरक्ष किलबिले, अनिल घोरपडे, अशोक बोरुडे, प्रकाश गाडेकर, प्रकाश शिंदे, श्रीराम सुद्रिक, सविता घोरपडे, विजया जायभाय, मनीषा क्षीरसागर, मनीषा किलबिले, अंजली खडके, सुनीता गाडेकर, मेघा गाडेकर, वनिता बलदवा, रंजना नरोटे, अश्विनी घोडके, पल्लवी ढवळे, येवले काकू, मीनाबाई पठारे, रेणूका गायकवाड, रोहिणी गायकवाड व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
श्री. दिलीप सातपुते म्हणाले की, आम्ही विकासकामे करून दाखवतो. कोणत्याही विकासकामांचा फार्स कधी केला नाही. जे आम्ही केले नाही, त्याचे श्रेय आम्ही कधीही लाटले नाही. आम्ही जे आश्वासन दिले ते पूर्ण करतो. विकासकामांत समाजकारण करायला आवडते. जनसामान्यांची कामे व्हावी हा शिवसेनेचा मुख्य उद्देश आहे, असे त्यांनी सांगितले .
नगरसेवक विजय पठारे म्हणाले की, निधी उपलब्धतेनुसार विकासकामांचे नियोजन करीत आहोत. येत्या काळात प्रभागाचा सर्वांगीण विकासकामांतून कायापालट करू. नम्रता कॉलनीतील रस्त्याची अनेक दिवसांपासूनची समस्या होती, ती आता काममस्वरूपी निकाली निघाली. शिवसेनेच्या माध्यमातून अशाच स्वरूपाची विकासकामे हाती घेण्यात येतील, असे त्यांनी सांगितले. सूत्रसंचालन डॉ. श्रीकांत चेमटे यांनी केले, तर आभार अविनाश मेहेर यांनी मानले.