देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 1 मे : 34,000 लिटरचा अवैध डिझेलचा टँकर स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात घेण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. आरोपीकडून 55 लाख 87 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
प्रस्तुत बातमीची हकीगत अशी की, दिनांक 30/04/2026 रोजी पो.नि/श्री. किरणकुमार कबाडी, स्था. गु. शा. अहिल्यानगर यांचे आदेशान्वये स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी पोउपनि/ दिपक मेढे पोलीस अंमलदार विजय पवार, राहुल द्वारके, प्रकाश मांडगे, सुनिल मालणकर, प्रशांत राठोड चालक अरुण मोरे अशांचे पथक कोपरगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्याची माहीती काढुन कारवाई करणे कामी पेट्रोलींग करीत असतांना पो.नि. श्री किरणकुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत, टँकर नंबर एम.एच.43 बी.पी. 5085 मध्ये अवैधरित्या पेट्रोल पंपावरुन डिझेल भरुन सुरजगड जि. गडचिरोली येथील खाणीमध्ये विक्री करण्यासाठी जाणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने, त्यांनी वरील पथकास बातमीतील हकिकत कळवुन खात्री करुन कायदेशीर कारवाई करणे बाबत सुचना दिल्या.
वरील सुचने प्रमाणे नमुद पथकाने तात्काळ समृध्दी महामार्ग पोल नं.520 येथे जावुन सापळा रचुन थांबले असता बातमीतील नमुद टँकर येतांना दिसुन आल्याने पथकाने सदर टँकर ताब्यात घेवुन पुरवठा अधिकारी श्री कोपसे यांचे समक्ष टँकरवरील चालकास त्याचे नांव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव 1) महादेव वचिष्ट डांगे वय- 50 वर्षे रा. शिवाजीनगर, नेरुळ नवी मुंबई, मुळ रा. पिंपळवाडी, ता.बार्शी जि. सोलापुर असे असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेवुन सदर टँकरमध्ये भरलेले डिझेल कोठुन व कोणाचे सांगणे वरुन भरलेले आहे याबाबत विचारपुस करता त्याने सांगितले की, 2) मोबाईल नंबर 8208703007(फरार) यावरुन डिझेल भरण्यासाठी चे लोकेशन 3) प्रतीक सानप(पुर्ण नांव माहिती नाही) (फरार) यास आले त्यानंतर प्रतीक सानप यांनी तो लोकेशन मला पाठविले त्याप्रमाणे 4) प्रमोद हरणे (पुर्ण नांव माहित नाही) (फरार) यांचे सांगणे वरुन साई प्रसाद पेट्रोल पंप, स्टेट हायवे 44 वरील हिंदुस्थान पेट्रोल पंप व शहापुर खर्डी रोडवरील हिदुस्थान पेट्रोल पंपावरु डिझेल भरुन ते सुरजागड जि.गडचिरोली येथे घेवुन जात असले बाबत कळविले आहे.
त्यानंतर पथकाने इसमाच्या ताब्यातुन 25,00,000/-रुपये कि.ची एक टँकर एम.एच.43 बी.पी. 5085असा असलेला, 30,87,840/- रु.कि.ची 34,000 लिटर डिझेल असा एकुण 55,87,840/- रुपये किंमतीची मुद्देमाल ताब्यात घेतला आहे.
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी शासनाचा कोणत्याही प्रकारचा करारनामा व परवाना न घेता, बेकायदेशिर व अवैधरित्या वेगवेगळ्या पेट्रोल पंपावरुन डिझेल टँकरमध्ये भरुन ज्वलनशिल पदार्थाबाबत पुरेशी काळजी न घेता स्वत:चे व इतरांचे जिवीतास धोका होईल अशा धोकादायक पध्दतीने विक्री करण्याकरीता घेवुन जात असतांना मिळुन आला आहे
ताब्यातील आरोपी विरुध्द कोपरगाव शहर पो.स्टे. गु.र.नं. 225/2026 भारतीय न्याय संहिता कलम 125,223,287, सह जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 चे कलम 3, 7, प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस स्टेशन करीत आहे.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा