सामाजिक

जेष्ठ नेते अशोक गायकवाड यांनी सरकारचे डोळे उघण्यासाठी सरकारच्या डोळ्यात अंजन घालणारी केली एक वास्तव कविता एक खेळ मांडून पाहू! एक खेळ मांडून पाहू! देवाभाऊ एक डाव करून पाहू!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर: दि. 30 एप्रिल : शिव, फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ नेते अशोक गायकवाड यांनी सध्याच्या वास्तव परिस्थितीवर सरकारचे डोळे उघडण्यासाठी डोळ्यात अंजन घालणारी केली एक वास्तव कविता
सहजच सुचलं! आदरणीय देवा भाऊ !
एक खेळ मांडून पाहू !
एक खेळ मांडून पाहू !
देशाची संसद बरखास्त करून
धर्म संसद आणू या ?
एक खेळ मांडून पाहू !
संविधान बाजूला ठेऊ !
मनुस्मृती आणू या ?
शिव, शाहू, फुले आंबेडकर यांना गाडू या !
गोडसे ,सावरकर राम रहीम आसाराम बापुला ला
आणू या ?
एक खेळ मांडून पाहू या !
माता जिजाई, माता सावित्री माता अहिल्यादेवी
माता रमाई ! यांना

बाजूला ठेऊ या !
कंगना, मैथिली ठाकूर यांना आणू या !
एक खेळ मांडू या ?

इतिहासाचे पुस्तकात
नामदेव ढसाळांच्या कविता ऐवजी
आ. संजय गायकवाड यांच्या शिव्या घेऊ या!
सायन्स चे पुस्तकात ‘ त्रिशूल डमरू चे महत्व अधोरेखित करू या ?
ताट वाट्या वाजवल्याने करोना ‘ पळाला
याची नोंद शासकीय पुस्तकात करू या !
एक डाव खेळू या!

शिवरायां बद्दल अपशब्द बोलणारे !
कोषारी, धीरेंद्र , आनंद स्वरूप यांची थडगी तरी बांधू या ?
एक डाव करून पाहू !
‘खजुराहो ‘च्या ठिकाणी भोंदू खरात चे टेबलाचे
‘सेक्स शिल्प ‘लाऊ या !

देवाभाऊ ! एक डाव करून पाहू ?
जेष्ठ नेते : अशोकराव गायकवाड

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे