विशेष प्रशासकीय

अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली! सहाय्यक पोलीस महानिरीक्षक मुबंई या महत्वाच्या पदावर वर्णी

 

 

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर (प्रतिनिधी)अहिल्यानगर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली!
सहाय्यक पोलीस महा निरीक्षक मुबंई या महत्वाच्या पदावर त्यांची वर्णी लागली असल्याची माहिती पोलीस सूत्रांकुडून मिळाली आहे. याबाबतची विस्तृत माहिती अशी की,
महाराष्ट्र पोलीस दलात प्रशासकीय कारणास्तव मोठे फेरबदल करण्यात आले असून, अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांची नूतन पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
पोलीस आस्थापना मंडळ क्र.१ च्या शिफारशीनुसार राज्यभरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश निर्गमित झाले आहेत. या आदेशानुसार, सोमनाथ घार्गे यांची नियुक्ती आता सहाय्यक पोलीस महानिरीक्षक (पोलीस महासंचालक कार्यालय, मुंबई) या महत्त्वाच्या पदावर करण्यात आली आहे. तर, मुमक्का सुदर्शन यांच्याकडे आता अहिल्यानगर जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे