सामाजिक

स्वर्गीय माजी आमदार अरुणकाका जगताप यांच्या जयंती निमित्त प्रेरणा प्रतिष्ठान आयोजित रक्तदान शिबिराचे आमदार संग्राम भैय्या जगताप यांच्या हस्ते उदघाटन नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांनी केले रक्तदान

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 25 मार्च : सर्व सामान्य माणसाच्या हकेला धावून येणारे व्यक्तीमत्व म्हणजेच स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांची आज जयंती या जयंतीच्या निमित्ताने अहिल्यानगर शहरात विविध ठिकाणी अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविण्यात आले.
स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या जयंती निमित्त प्रेरणा प्रतिष्ठानच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे येथील लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उदघाटन हिंदूधर्मरक्षक आमदार संग्राम भैय्या जगताप, महापौर जोतीताई गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, आयुक्त यशवंत डांगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी उपमहापौर गणेश भोसले, माजी महापौर भगवान फुलसौंदर, नगरसेवक अविनाश तात्या घुले, नगरसेवक सुरेशभाऊ बनसोडे, विपुल शेटीया,गोरख पडोळे,, गणेश कवडे, सागर मुर्तुडकर,महेश लोंढे, मयूर बांगरे, आदीसह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.
यावेळी आयोजित रक्तदान शिबिरात नगरसेवक सुरेश भाऊ बनसोडे यांच्यासह शहरातील अनेक कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. यावेळी आयुर्वेद कॉलेजचे अध्यक्ष सचिनभाऊ जगताप, जेष्ठ नेते अशोक गायकवाड, निलेश बांगरे, विशाल भिंगारदिवे,समीर भिंगारदिवे आदिसह शहरातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे