देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 25 मार्च : सर्व सामान्य जनतेच्या मनातले काका आमदार अरुण काका जगताप यांच्या जयंती निमित्त आज अहिल्यानगर शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सकाळ पासूनच स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांना आभिवादन करण्यासाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना, काकांना अभिवादन करण्यासाठी गर्दी करत असल्याचे चित्र अहिल्यानगर शहरात दिसत होते.
फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीला काकांनी नेहमीच सहकार्य केलेले आहे. ते नगराध्यक्ष शहरातील आंबेडकर स्मारक उभारण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे. आंबेडकरी चळवळीतील विविध प्रश्न त्यांनी मार्गी लावले. फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीच्या वतीने स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप यांना लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी प्रा. जयंत गायकवाड, देशस्तंभ ऑनलाईन न्यूजचे महेश भोसले, अजय भिंगारदिवे सर, आरपीआय आठवले गटाचे शहर जिल्हा अध्यक्ष किरण दाभाडे, राहुल अजय साळवे व कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा