देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 25 मार्च : स्वर्गीय आमदार अरुण काका जगताप आमदार या शब्दापेक्षा सर्व सामान्य माणसाचे हक्काचे काका यांच्या जयंती निमित्त प्रभागक्रमांक 13 च्या वतीने अरुणोदय गौशाळा येथे चारा वाटप करण्यात आले. यावेळी बोलतांना प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक व महानगर पालिकेचे स्थायी समिती सदस्य सुरेशभाऊ बनसोडे म्हणाले, स्वर्गीय अरुणकाका जगताप यांचा गौसंवर्धन व गौरक्षणाचा वारसा आमदार संग्राम भैय्या जगताप समर्थपणे राबवत आहेत. म्हणूनच ते महाराष्ट्रात हिंदूधर्म रक्षक व गौरक्षक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. आज अरुणोदय गौशाळेचा 14 वाढदिवस असून आजच स्वर्गीय अरुण काका जगताप यांची जयंती आहे. या गौशळेत जवळपास 250 गायीचे संगोपन करण्याचे काम होत आहे. आम्ही दरवर्षी अरुणकाका यांच्या जयंती निमित्त समाजउपयोगी कार्यक्रम राबविण्यात येत असतात. गौसंगोपन करणारे संचालक मिनिष फुलडहाळे यांना रोख 50 हजार रुपये देणार असल्याची घोषणा करण्यात आली.
यावेळी जेष्ठ नगरसेवक अविनाश तात्या घुले,नगरसेवक सुरेश बनसोडे, गोरख पडोळे, विपुल शेटीया,आंबेडकरी चळवळीचे जेष्ठ नेते अशोक गायकवाड, देशस्तंभ न्यूजचे महेश भोसले, तसेच कार्यकर्ते उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा