देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर,दि. 20 मार्च : विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती संपूर्ण भारतभर व भारताच्या बाहेरही मोठ्या उत्साही आनंदी वातावरणात साजरी होत असते. याच पार्श्वभूमीवर याही वर्षी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती साजरी होणार आहे. या जयंतीच्या नियोजन, मिरवणूकीचे नियोजन, मिरवणूक परवानगी, विविध अडचणी, विविध कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी रविवार दि. 22 मार्च रोजी दुपारी 1 वाजता दादासाहेब रुपवते विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सिद्धीबाग येथे तमाम आंबेडकरी चळवळीच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
अहिल्यानगर मधील तमाम आंबेडकरी चळवळीतील सामाजिक संघटना,रिपब्लिकन पक्षाचे विविध गट,व सर्व मंडळे, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे.असे आवाहन तमाम आंबेडकरी समाजाच्या वतीने करण्यात आले आहे
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा