अभिनंदनीय

प्रा .अनिरुद्ध आडसूळ यांना पी. एच. डी.पदवी प्रदान! आडसूळ बी. एड. कॉलेजने केला सत्कार!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर,दि. 20 मार्च :साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. अनिरुद्ध माणिक आडसूळ यांना मॅनेजमेंट या विषयातील पीएचडी पदवी दि. 18 मार्च रोजी प्रदान करण्यात आली. याबाबत आडसूळ बीएड कॉलेजच्या वतीने त्यांचा नुकताच सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ देत व फेटा बांधून त्यांचे अभिनंदन करत त्यांचा सन्मान करण्यात आला.यावेळी आडसूळ बीएड चे प्राचार्य घनश्याम गिरवले समवेत संस्थेचे खजिनदार परमेश्वर अडसूळ रत्नाताई आडसूळ संदीप पारधे व इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रा. आडसूळ यांना पी.एच. डी. प्रदान करण्यात आल्यामुळे त्यांचे विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत असून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे