गुन्हेगारी

पोलीस असल्याची बतावणी करुन नागरीकांची फसवणुक करुन चोरी करणारा आरोपी स्थानिक गुन्हे शाखेकडुन जेरबंद

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : आहिल्यानगर, दि. 19 मार्च :प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, दिनांक 09/08/2025 रोजी 11/50 ते 12/00 वा.दरम्यान फिर्यादी रविंद्र नारायण राजहंस रा. प्लॉट नं.31 सर्वे नं.27/1 क अशोकनगर सावेडी, अहिल्यानगर हे भैय्या गंधे यांचे बंगल्यासमोर जॉगिंग पार्क जवळ सावेडी येथे फोन करण्यासाठी गाडीवर थांबलेले असतांना तेथे मोटार सायकलवर डोक्यात हेल्मेट घालुन आलेला इसम व पायी चालत आलेला इसम या दोघांनी संगणमत करुन फिर्यादी यांना पोलीस असल्याचे सांगुन सक्सेना यांचा पत्ता विचारण्याचे कारण देवुन एकाने त्याचे पोलीस असल्याचे आय कार्ड दाखवुन फिर्यादीचे खिशातील मोबाईल सुट्टै पैशाची चिल्लर व हातातील सोन्याचे दोन व तांब्याच्या दोन अंगठ्या असे काढुन पिशवीत ठेवले आहेत असे सांगुन त्यातील सोन्याच्या दोन अंगठ्या व तांब्याच्या दोन अंगठ्या विश्वास संपादन करुन घेवुन जावुन फिर्यादीची फसवणुक केली आहे. सदर घटनेबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस स्टेशन गु.र.नं.822/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 204,318(4),316(2), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
श्री सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, यांनी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये पोलीस असल्याची बतावणी करुन चोरी करणारे आरोपीची माहिती काढुन शोध घेणे बाबत पो.नि. स्थागुशा, अहिल्यानगर यांना सुचना दिले होते.
त्यानुसार किरणकुमार कबाडी, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार राहुल द्वारके, फुरकान शेख, भिमराज खर्से, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, सुनिल मालणकर, भगवान थोरात, सतिष भवर, चालक उत्तरेश्वर मोराळे यांचे पथक तयार आरोपीचे शोध घेणे बाबत सुचना व मार्गदर्शन करुन रवाना केले.
पथकाने वरील गुन्ह्यातील आरोपीबाबत माहिती काढत असतांना पथकास सदरचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी नामे सज्जाद गरीब शहा इराणी याने त्याचे साथीदारास केला असुन तो गोविंदपुरा नाका, भिंगार परिसरात येणार असल्याची माहिती मिळाली. सदर माहिती नुसार पथकाने गोविंदपुरा नाका, भिंगार परिसरात जावुन सापळा रचुन थांबले असता. एक इसम संशयीतरित्या फिरतांना दिसुन आला. तेव्हा पथकाने त्यास ताब्यात घेवुन त्याचे नाव गाव विचारले असता त्याने त्याचे नांव 1) सज्जाद गरीब शहा इराणी वय- 47 वर्षे रा. इराणी गल्ली, वार्ड नं.1 श्रीरामपुर असे असल्याचे सांगितले. त्यास विश्वासात घेवुन सदर गुन्ह्याबाबत विचारपुस करता त्याने सदरचा गुन्हा हा मी व माझा चुलत भाऊ 2) मुस्लीम यासीन इराणी रा. इराणी गल्ली, वार्ड नं.1 श्रीरामपुर(फरार) अशानी मिळुन केले असल्याची कबुली दिली आहे. तसेच ताब्यातील आरोपीकडे पुन्हा विश्वासात घेवुन आणखी काही गुन्हे केले आहे काय बाबत विचारपुस करता त्याने संगमनेर येथे गुन्हा केले
असल्याचे सांगितले आहे. सदर घटनेबाबत संगमनेर शहर पोलीस स्टेशनला अभिलेखाची खात्री केली असता संगमनेर शहर पोलीस स्टेशन गु.र.नं.584/2025 भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 204, 318(4), 3(5) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याची निष्पन्न झाले आहे.
आरोपी नामे सज्जाद गरीब शहा इराणी याचेविरुध्द यापुर्वी खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत.
अ.नं. पोलीस स्टेशन गु.र.नं. व कलम
1 काळाचौकी जि.मुंबई गु.र.नं.389/2025 बी.एन.एस.कलम 316,318,3(5)
2 रामानंद जि.जळगाव गु.र.नं.344/2025 बी.एन.एस.कलम 303(2)
3 सांगवी, पिंपरी चिंचवड गु.र.नं.36/2014
4 भोसरी, पिंपरी पिंचवड गु.र.नं. 14/2014
5 सांगवी, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 103/2024
6 चिंचवड, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 06/2014
7 सांगवी, पिपरी चिंचवड गु.र.नं.95/2014
8 निगडी, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 90/2014
9 सांगवी, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 97/2014
10 निगडी, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 184/2014
11 वारजेमाळवाडी, पुणे शह गु.र.नं. 291/2013
12 हडपर, पुणे शहर गु.र.नं. 179/2014
13 भोसरी, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 113/2014
14 सांगवी, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 63/2014
15 चिंचवड, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 264/2013
16 चिंचवड, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 248/2013
17 सिडको, छत्रपती संभाजीनगर गु.र.नं. 106/2013
18 चिंचवड, पिंपरी चिंचवड गु.र.नं. 80/2014
19 कोथरुड,पुणे शहर गु.र.नं. 296/2011
20 हडपर, पुणे शहर गु.र.नं. 492/2012
21 कोथरुड, पुणे शहर गु.र.नं. 297/2011
22 उस्मानपुरा, छत्रपती संभाजीनगर गु.र.नं. 79/2013
23 फरासखान, पुणे शहर गु.र.नं. 27/2014
तसेच सदर आरोपीविरुध्द वरील गुन्हे व्यतिरिक्त आणखी 100 ते 125 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे.
ताब्यातील आरोपीस पुढील तपासकामी तोफखाना पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आलेले असुन पुढील तपास तोफखाना पोलीस स्टेशन हे करीत आहेत.
सदरची कारवाई मा. श्री. सोमनाथ घार्गे पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे वरील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केलेली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे