देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर, दि. 23 मार्च : विश्व्रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती आपल्याला साजरी करायची आहे, त्यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो आहोत, सी. डी. लावायचा म्हणून आपण एकत्र आलो नाहीत. सी. डी. लावण्यास प्रशासनाने परवानगी दिली किंवा नाही दिली तरी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी होणारच आहे.अहिल्यानगर शहरातील आंबेडकरी चळवळीचा आवाज दाबण्याचे काम जिल्हा प्रशासन व पोलीस प्रशासन करत असल्याचा आरोप बैठकीचे अध्यक्ष माजी नगरसेवक अजय साळवे यांनी विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 जयंतीच्या नियोजन बैठकीत केला.
नुकतीच सकल आंबेडकर समाजाच्या वतीने दादासाहेब रुपवते विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील सभागृहात बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करत बुद्धवंदना घेण्यात आली. यावेळी जेष्ठ मार्गदर्शक अशोक गायकवाड, प्रा. जयंत गायकवाड, सुनील क्षेत्रे,प्रा. विलास साठे, प्रा. जाधव,सुनील साळवे,गौतम म्हस्के, सुमेध गायकवाड,अमित काळे, महेश भोसले, विनोद गायकवाड, किरण दाभाडे, सनी माघाडे, संजीवन साळवे सर, अजय भिंगारदिवे सर,
राजूभाऊ शिरसाठ, आशुतोष अजय भिंगारदिवे, मुन्ना भिंगारदिवे, संजय भिंगारदिवे, महेश शेळके,रमेश भिंगारदिवे, गौरव भाकरे, प्रेम साळवे, संजय साळवे, आमन काते,विशाल साळवे, सिद्धार्थ पगारे, राहुल साळवे, वृषाल साळवे, वैभव डाके, रतन तुपविहिरे, किरण गायकवाड, सुशील साठे, रुपेश शेलार, सचिन शेलार, सागर ठोकळ, अतुल सोनवणे, किरण शिंदे, किरण शिरसाठ,अजित नरवडे, सुशांत शिरसाठ, संदेश भोसले, श्रीकांत भोसले, जाफर बेग, विजय गायकवाड,
मनोज रणमले, कौशल गायकवाड, अजय पाखरे, प्रबुद्ध कांबळे, साहिल शेख, करण साळवे,सुजित घंगाळे, नितीन कसबे, आकाश शिंदे, अमित घाटविसावे, उदय गायकवाड, तेजस गायकवाड, अजय गायकवाड, शिवम झेंडे,सुजित उघडे, विशाल गायकवाड, वेदांत शेलार, जयेश पंडित, ओंकार गांगर्डे,
किरण पवार, तुषार बोराडे, आकाश सरोदे, मोनेश पंडित, शार्वीन साळवे, ओमकार शेलार, अनिकेत साळवे,यश शेलार आदी कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संघटना व आंबेडकरी चळवळीतील विविध गटांचे कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी बोलतांना ते पुढे म्हणाले डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या बाबतीत जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन यांनी योग्य भूमिका घेतली तर निश्चितच मिरवणुकीत सीडी लावण्याबाबत मार्ग निघेल, व पोलीस प्रशासनाला सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती सहकार्य करेल.
यावेळी जेष्ठ मार्गदर्शक अशोक गायकवाड, संजय भिंगारदिवे,किरण दाभाडे, प्रा. जयंत गायकवाड, प्रा. विलास साठे, सुनील क्षेत्रे, सुमेध गायकवाड, अमित काळे, सनी माघाडे, सागर ठोकळ यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी 1) सीडी परवानगीसाठी तारीख ठरविणे, आमदार, जिलधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक,पालकमंत्री यांची भेट घेऊन निवेदन सादर करणे, 2) जयंतीच्या काळात प्रत्येक मोहल्यातील तारखांचा कार्यक्रम समन्वय साधने 3) सांस्कृतिक कार्यक्रम विविध स्पर्धेच्या आयोजन उदा.निबंध, वक्तृत्व,चित्रकला, मॅरेथॉन आदी
4) मिरवणूक मार्ग नियोजन परवानगी
5) अहिल्यानगर शहराची जयंती समिती गठीत करणे.
6) महात्मा फुले जयंती साजरी करणे
7) सकाळच्या शासकीय कर्यक्रमाची एकच वेळ असावी.
आदी महत्वपूर्ण विषयावर साधक बाधक चर्चा करण्यात आली. बैठकीचे सूत्रसंचालन प्रा. जयंत गायकवाड यांनी केले. प्रास्ताविक महेश भोसले यांनी केले. या बैठकीस शहरातील विविध भागातील कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा