क्रिडा व मनोरंजन

मनसे तर्फे शिवजयंती निमित्ताने जामखेडमध्ये राज्यस्तरीय नुत्य स्पर्धचे आयोजन

जामखेड प्रतिनिधी दि12
सालाबाद प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राहुल कन्स्ट्रक्शन व जामखेड तालुका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत स्थानिक कलाकारांसह जिल्हातील नवोदित कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्द व्हावे याकरिता याहीवर्षी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून राज्यस्तरीय वैयक्तिक व समूह नुत्य स्पर्धचे आयोजन करण्यात आले असून असल्याची माहिती मनसे नेते उद्योजक हवादादा सरनोबत,कुसडगावचे सरपंच बापूसाहेब कार्ले यांनी दिली.
येथील नगर रोड वरील जामखेड सेंट्रल पंचायत समिती समोर असलेल्या प्रागंणात दि १९ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊ वाजता छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन आमदार रोहित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार असून या नंतर ६ते १५ गट मध्ये वैयक्तिक नुत्य स्पर्धा होणार असून याकरिता प्रथम बक्षीस ,वैभव जामकावळे ५ हजार २२२ ,िद्वतीय बक्षिस आलेश जगदाळे ३ हजार २२२ तृतिय बक्षिस बिभिशन कदम २ हजार २२२ ,चतुर्थ बक्षीस गणेश पवार १ हजार २२२ असणार असून त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता खुला गट समूह नुत्य स्पर्धचे आयोजन करण्यात आले असून प्रथम बक्षीस २१ हजार २२२,,िद्वतीय बक्षिस ११ हजार २२२,तृतिय बक्षिस ७ हजार २२२ सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्रक विजेत्यांना बक्षीस वितरण त्याच दिवशी देण्यात येणार आहे या स्पर्धेत सहभागी होण्याकरिता श्रीधर सिध्देश्र्वर ९८२२४१२७४१,ओंकार दळवी ९०११५०१२२१,अविनाश बोधले ९५९५४२२४२२ रजणीकांत साखरे ९९२१५९१५९७,सनी सदाफुले ९८९०८१५५९९ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे स्पर्धा यशस्वी होण्याकरिता आयोजक मनसे नेते हवादादा सरनोबत,मनसे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे कुसडगांवचे सरपंच ,बापुसाहेब कार्ले मनसे ता उपाध्यक्ष,सनी सदाफुले,विशाल भांडवलकर,बालु साठे,सोनु कदम आदींसह कार्यकर्ते परिश्रम घेत आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे