देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि., 4 ऑक्टोबर :
अहिल्यानगर येथील जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रशासकीय अधिकाऱ्याने कक्ष सेविकेला रुग्णालयातील महिला अधिकारी व एक महिला परिसेविका यांच्या मार्फत शारीरिक सुखाची मागणी केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
जिल्हा रुग्णालय येथील डॉ. साहेबराव डवरे असे या प्रशासकीय अधिकाऱ्याचे नाव असल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणी पीडित कक्ष सेविकेने शासनाच्या 104 या पोर्टलवर दि. 25 सप्टेंबर 2025 रोजी तक्रार देखील दाखल केली आहे.
याबाबतीत प्रशासकीय यंत्रने कडून सबंधित प्रशासकीय अधिकाऱ्या बाबत कोणतीही ठोस कार्यवाही झालेली दिसत नाही.या संदर्भात राजकीय दबावाखाली कारवाई होत नसल्याची चर्चा जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी दबक्या आवाजात बोलत आहेत.याबाबतीत
पीडित कक्षसेविका गुन्हा दाखल करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
डेप्युटी डायरेक्टर श्री. आहेर (नाशिक ) हे दिनांक 3ऑक्टोबर रोजी जिल्हा रुग्णालयात आले असतांना त्यांना याबाबत देशस्तंभ न्यूजने विचारणा केली असता, या प्रकरणी योग्य कारवाई करणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
एकंदरीतच जिल्हा आरोग्य यंत्रणेला शरमेने मान खाली घालायला लावणाऱ्या या प्रकरणाकडे फक्त आरोग्य विभागाचेच नव्हे तर अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा