विशेष प्रशासकीय

” दोनच राजे इथे गाजले, एक त्या रायगडावर, एक चवदार तळयावर ” कोतवाली पोलीस ठाण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा छोटेखानी पुतळा, राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधानाची प्रतिमा लक्ष वेधते

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क : अहिल्यानगर : दि. 7 जुलै (महेश भोसले )
रयतचे छत्रपती शिवाजी महाराज, व संविधान निर्माते राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ” दोनच राजे इथे गाजले, एक त्या रायगडावर, एक चवदार तळयावर ” या गाण्याप्रमाणे कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये ठाण्याचे प्रमुख पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा छोटेखानी पुतळा व त्याच्या उजव्या व डाव्या बाजूला लावलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर व भारतीय संविधनाची प्रतिमा पोलीस ठाण्यात येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष निश्चितच वेधते आहे. ज्या वेळेस डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्य घटना लिहिली त्यावेळेस त्या वेळच्या काही पत्रकार बांधवानी आंबेडकरांना एक प्रश्न विचारला ” बाबासाहेब आपल्याला घटना लिहिताना काही अडचणी आल्या का?” त्यावेळेस बाबासाहेब आंबेडकर यांनी खूप मार्मिक उत्तर दिले, ते म्हणाले ” मला भारतीय राज्यघटना लिहीत असतांना फारशा अडचणी आल्या नाहीत, त्या महत्वाचे कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्ये अवघे स्वराज्य माझ्या डोळ्यासमोर उभे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेचे हित पाहिले, त्याप्रमाणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सर्व सामान्य माणसाचे हित पाहत भारतीय संविधानाची निर्मिती केली, या महत्वाच्या बाबींची आठवण कोतवाली पोलीस ठाण्यात गेल्यावर निश्चितच होते. हि आदर्शवत मांडणी सर्वच शासकीय लक्षात घेणे गरजेचे आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे