कर्ज फेडीसाठी दिलेला धनादेश वटला नाही.कर्जदारास तीन महिने शिक्षा व पंधरा लाख रुपए दंड!

अहमदनगर दि.२० जुलै (प्रतिनिधी)
अहमदनगर येथील श्रीसद्गुरू पतसंस्थेकडून वाहन खरेदीसाठी कर्जदार छगन सोन्याबापू वाघ याने कर्ज घेतले होते. थकित कर्जफेड करण्यासाठी त्याने पतसंस्थेस धनादेश दिला होता. सदरचा धनादेश वटला नाही व पतसंस्थेस कर्ज रक्कम मिळालीच नाही म्हणून पतसंस्थेने अहमदनगर येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांचे कोर्टात निगोशिएबल इन्स्टुमेंटं कायदा कलम 138 प्रमाणे आरोपी छगन वाघ याचे विरुद्ध केस दाखल केली होती. सदर केसची सुनावणी 13 वे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी श्री. एम.पी. पांडे साहेब यांचे समोर झाली. फिर्यादी पतसंस्थेकडून व्वस्थापक सुरेश विठ्ठल कुलकर्णी व उमेश डोके यांची नोंदविण्यात आली व ती ग्राह्यधरण्यात आली. तसेच अवश्यक तो कागदोपत्री पुरावा दाखल करण्यात आला. फिर्यादीची गुणदोषावर सुनावणी होऊन आरोपी छगन वाघ यास दोषी धरून त्याला न्यायाधीश एम.पी. पांडे साहेब यांनी
परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१ चे कलम १३८ अन्वये परिभाषीत व दंडनीय गुन्हयात दोषी धरून ०३ महिन्यांचा सश्रम कारावास तथा रक्कम रु. १५,००,०००/- (रक्कम रूपये पंधरा लाख केवळ) द्रव्य दंडाची शिक्षा तथा त्याने द्रव्य दंडाचा भरणा न केल्यास ०१ महिना साध्या कारावासाची शिक्षा भाेगावी असे फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम २५५ (२) प्रमाणे तथा परक्राम्य संलेख अधिनियमाचे कलम १४३ अन्वये ठोठावण्यात आली तसेच आरोपीकडून उपरोक्त दंडाची रक्कम रु. १५,००,०००/- (रक्कम रूपये पंधरा लाख केवळ) वसूल झाल्यावर फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम ३५७ (१) (ब) नुसार ती संपुर्ण रक्कम फिर्यादीस देण्यात यावी असा आदेश करण्यात आला.
फिर्यादी श्री सद्गुरु पतसंस्थेच्या वतीने ॲड शिवाजीराव कराळे पा. ॲड करुणा रामदास शिंदे व ॲड सत्यजीत कराळे पा. यांनी कामकाज पाहिले.