श्री.सद्गुरु पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्ज फेडी साठी दिलेला धनादेश वटला नाही, कर्जदार साबळे यास तीन महिने शिक्षा व सहा लाख पंचावन्न हजार रुपए दंड

अहमदनगर दि. 1 फेब्रुवारी ( प्रतिनिधी )- येथील श्री सद्गुरु ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेकडून कर्जदार विशाल नारायण साबळे याने वाहन कर्ज घेतले होते. थकीत कर्ज फेडी साठी त्याने पतसंस्थेस धनादेश दिला होता. सदर धनादेश पतसंस्थेने त्यांचे खात्यात वटविण्यासाठी भरला असता तो चेक वटला नाही व पतसंस्थेस कर्जाचे पैसे मिळाले नाहीत. म्हणून पतसंस्थेने अहमदनगर येथील चिफ ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट साहेब यांचे कोर्टात निगोशिएबल इंस्ट्रूमेंट्स ॲक्ट चे कलम 138 प्रमाणे फिर्याद दाखल केली. सदर केस ची पुढील सुनावणी अतिरिक्त
मुख्य न्यायदंडाधिकारी श्री कर्वे साहेब यांचे समोर झाली. फिर्यादी पतसंस्थेकडून व्यवस्थापक सुरेश विठ्ठल कुलकर्णी यांची साक्ष नोंदविण्यात आली. तसेच अवश्यक तो कागदोपत्री पुरावा दाखल करण्यात आला. फिर्यादिची गुणदोषावर सुनावणी होऊन आरोपी विशाल नारायण साबळे यास दोषी धरून त्याला न्यायाधीश श्री दिपक कर्वे यांनी फौ.प्र.सं. 1973 चे कलम 255-2 नुसार तथा परक्राम्य संलेख अधिनियम 1881 चे कलम 138 मध्ये दोषी धरून तीन महिन्याची साधी कैद व रुपये सहा लाख पंचावन्न हजार दंड अशी शिक्षा दिली आहे. तसेच दंड न भरल्यास पंधरा दिवस साधी कैद देण्यात आली आहे. आरोपीने दंडाचे रकमे पैकी कलम 357-1 नुसार फिर्यादीस सहा लाख बावन्न हजार द्यावेत असा आदेश करण्यात आला आहे.
फिर्यादी पतसंस्थे कडून व्यवस्थापक सुरेश विठ्ठल कुलकर्णी यांची साक्ष ग्राह्यधरण्यात आली. संस्थेकडून ॲड शिवाजी अण्णा कराळे , ॲड करुणा रामदास शिंदे व ॲड सत्यजीत शिवाजी कराळे यांनी कामकाज पाहिले.
‐—————————