संगमनेर दि. 31 जानेवारी : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील असणाऱ्या खांबे वरवंडी शिवाच्या रस्त्यावरून जाणाऱ्या विद्युत वाहिनीला उसाच्या ट्रक चे घर्षण झाल्याने ट्रक पेटला आणि ट्रक चालक जागेवर मयत झाला. सविस्तर माहिती अशी की, शेरी चिखलठाण वरून एम एच १४ बी जे २२५१ या क्रमांकाची ट्रक ऊस भरून संगमनेर साखर कारखान्याकडे जात असताना खांबे वरवंडी शिवा जवळील रस्ता क्रॉस करून गेलेल्या विदयुत वाहिनीची तार ही उसाच्या भरलेल्या ट्रक वर घर्षण झाल्याने संपूर्ण ट्रक वर करंट उतरून ट्रक ने पेट घेतला आणि चालक संतोष मोटे हा चालक जागेवरच करंट बसून मृत झाला. सदरील घटना वाऱ्यासारखी समजताच संगमनेर साखर कारखाण्यातून तातडीने अग्निशामक पाचरण करण्यात आले त्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळून होणारे मोठे नुकसान टळले असून मात्र दुर्दैवी चालक संतोष मोटे हा जागेवरच करंट बसून मयत झाला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा