अहमदनगर दि. 28 जानेवारी (प्रतिनिधी )
शनिवार दि.27/01/2024 रोजी सकाळी 11/30 वा चे सुमारास मा.पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, यांना गुप्त बातमी मिळाली की, कौलारु सर्जेपुरा येथे तीन ठिकाणी वेगवेगळ्या गाळ्यामध्ये गोमांस विक्री चालु असल्याची गोपनिय बातमी मिळाल्याने त्यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना आदेश दिल्याने त्यांनी कैलारु , सर्जेपुरा येथे तीन ठिकाणी छापा टाकुन इसम 1) तनवीर सत्तार कुरेशी, वय 40 वर्षे रा.सुभेदार गल्ली, बुढान फौजदारी मस्जिदजवळ, अहमदनगर 2) इम्रान मोहम्मद हानीफ वय 32 वर्षे रा.व्यापारी मोहल्ला , झेन्डीगेट, ता जि अहमदनगर 3) शाकीर सय्यद हारुन वय 35 वर्षे रा. सुभेदार गल्ली, बुढान फौजदारी मस्जिदजवळ, ता जि अहमदनगर यांच्यावर छापा टाकुन त्यांच्याकडुन एकुण 42,400/- रु किं.चा मुद्देमाल त्यात 171 किलो गोमांस, तीन वजनी काटे, गोमांस कापण्यासाठी लागणारे 06 सुरे असा मुद्देमाल एकुण 42,400/- रु किं.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्यावर तोफखाना पोलीस स्टेशन येथे भा.दं.वि.क 269, 188 महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा ) अधिनियम 1995 चे कलम 5 (ब) (क) 9 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.
सदरची कारवाई मा.पोलीस अधीक्षक अहमदनगर श्री.राकेश ओला सो, मा.अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे सो, अहमदनगर, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी ,नगर शहर विभाग, हरिष खेडकर सो,मा. पोलीस निरीक्षक आनंद कोकरे तोफखाना पो.स्टे अहमदनगर यांचे मार्गदर्शन व सुचनाप्रमाणे पो.उप.नि. सचिन रणशेवरे , पोहेकॉ/ दत्तात्रय जपे, सुनिल शिरसाठ, अहमद इनामदार, दिनेश मोरे, भानुदास खेडकर, पो.ना संदिप धामणे, वसिम पठाण, पो.कॉ सुमित गवळी, सतिष त्रिभुवन , शिरिष तरटे, दत्तात्रय कोतकर, सतिष भवर, बाळासाहेब भापसे सर्व नेम-तोफखाना पो.स्टे.अ.नगर अशांनी केली आहे.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा