देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क :अहिल्यानगर दि. 11 एप्रिल: निलक्रांती चौक, गौतमनगर येथील फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुशीलाबाई भीमराव साळवे(वय : 76)यांचे पुणे येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये काल रात्री 9वाजून 19 मिनिटांनी अल्पआजाराने निधन झाले. सुशीलाबाई त्यांच्या शांत व मनमिळाऊ स्वभावाने परिसरात प्रसिद्ध होत्या. त्यांच्या निधनाने नातेवाईक व परिसरातील नागरिकामधून हळहळ व्यक्त होत आहे.
1950 साली निलक्रांती चौक येथील साळवे परिवारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सदिच्छा भेट दिली होती. त्यावेळेस या भेटीची जिल्ह्यात चर्चा झाली होती. त्यांच्या पश्यात 3 मुले, 3 सुना, 2 मुली, 1 जावई, 7 नातवंडे, नातेवाईक, मित्रपरिवार असा मोठा परिवार आहे. त्यांचा अंत्यविधी आज दुपारी 1.30 वाजता नालेगाव येथील अमरधाम येथे होणार आहे.त्यांना समस्त आंबेडकरी चळवळीच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा