नगर दि. 12 जुलै (प्रतिनिधी ) फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतील नगर तालुक्यातील दरेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते रोहिदास उर्फ बाळू भिंगारदिवे ( वय 46 )यांचे आज पहाटे दुःखद निधन झाले.त्यांच्या पश्यात त्यांचे वडील, भाऊ, बहिणी तसेच त्यांच्या पत्नी माजी जिल्हा परिषद सदस्य पूनमताई भिंगारदिवे, दोन मुले, नातेवाईक, असा मोठा परिवार आहे. दरेवाडी गावाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य दिवन्गत शारदाताई भिंगारदिवे यांचे ते चिरंजीव होत. कोणत्याही कुटूंबाशी हसून बोलणे, कोणत्याही सुख दुःखाच्या प्रसंगी सक्रिय सहभागी होणे ही त्यांची ख्याती होती. त्यांच्या अकाली जाण्याने फुले, शाहू, आंबेडकरी चळवळीतून तसेच दरेवाडी गावातून हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचा अंत्यविधी आज दुपारी 1.30 वाजता दरेवाडी येथे होणार आहे.
देशस्तंभ न्यूज परिवारा तर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🌹🌹🌹
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा