दरेवाडी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आभिवादन बुद्ध वंदणेसाठी बुद्ध विहारात लाऊड स्पीकर देणार :अनिल करांडे

दरेवाडी दि. 6 डिसेंबर (प्रतिनिधी ) विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 67 व्या महापरिनिर्वाण दिनी नगर तालुक्यातील दरेवाडी येथील समाज मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले.अभिवादन प्रसंगी बोलतांना दरेवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल करांडे म्हणाले, बोद्ध समाज बांधवाना बुद्ध विहारामध्ये समाजातील कार्यकर्त्यांच्या आग्रही मागणीमुळे बुद्ध वंदना घेण्यासाठी दरेवाडी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समाज मंदिराकरीता लाऊड स्पीकर उपलब्ध करून देऊ, यावेळी देशस्तंभ न्यूजचे उपसंपादक जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश भिंगारदिवे व माजी ग्रामपंचायत सदस्या, पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या महिला अध्यक्ष गौतमी भिंगारदिवे
यांच्या वतीने समाज मंदिरात राजमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीमाता फुले, छत्रपती शिवाजी महाराज,माता रामाबाई आंबेडकर, क्रांतीबा ज्योतीबा फुले, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांच्या प्रतिमा भेट देण्यात आल्या.यावेळी ग्रामपंचायत सदस्या आकांशा भिंगारदिवे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाजीराव भिंगारदिवे, गणेश बडेकर,सागर भिंगारदिवे,वंदना पातारे,कांचन भिंगारदिवे,प्रेरणा भिंगारदिवे, मयुरी भिंगारदिवे, कुसुम भिंगारदिवे, नंदाताई जगताप, मीरा घोडके, दिपाली साळवे यांच्यासह दरेवाडी भागातील नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.