प्रभागातील एक ही भाग विकासापासून वंचित ठेवणार नाही – संपत बारस्कर देविकृपा कॉलनी दिशा दर्शक फलकाचे अनावरण

नगर (प्रतिनिधी) – भिस्तबाग महल जवळील कजबे मळ्यातील देविकृपा कॉलोनी दिशा दर्शक फलकाचे अनावरण अहमदनगर महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते संपत बारस्कर यांचे हस्ते व माजी नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा यांच्या सहकार्याने झाले या वेळी प्रभागातील नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.
या वेळी बोलतांना नगरसेवक संपत बारस्कर म्हणाले मी आपल्या प्रभागात हरित क्रांती केले असून हजारो झाडे लावून त्याचे संवर्धन केले आहे. प्रभागात काम करतांना कोणतेही राजकारण केले नाही. नागरिकांना जास्त सुविधा देण्याचे प्रयत्न केलेले आहे. या पुढे प्रभागातील एक ही भाग विकासापासून वंचित ठेवणार नाही असे आश्वासन नागरिकांना दिले.
या वेळी माजी नगरसेविका सौ. वीणाताई बोज्जा म्हणाले नागरी सुविधा मिळणे नागरिकांचा हक्क असून तो पूर्ण करण्याचे प्रयत्न आपले नगरसेवक करीत आहेत ही अभिनंदनीय गोष्ट आहे. या पुढे ही येथील नागरिक आपल्याला मदत करतील अशी ग्वाही दिली.
या वेळी मुंबई महानगरपालिका माजी उपायुक्त अशोक बोज्जा यांचे हस्ते नगरसेवक संपत बारस्कर यांचा कॉलोनी च्या वतीने सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे स्वागत फटाका असो चे अध्यक्ष श्रीनिवास बोज्जा यांनी केले तर आभार रवींद्र लोखंडे यांनी मानले या वेळी प्रभागातील नागरिक अनिल ढवण, सौ.मीरा बारस्कर, सौ. पूजा गाली, श्री. दिपक रोकडे, श्री. राजू देशमुख, श्री. दीपक गाली, श्री.एखे साहेब, सौ. सुजाता लोखंडे, सौ. कुलकर्णी, सौ. स्वाती गोरड, सौ. लता बोज्जा, सौ.वैभवी बनकर , सौ. अश्विनी शिंदे, सौ. मनीषा उल्हारे, सौ. मनीषा पाटील, सौ. वृषाली सांगोले, सौ. जयश्री गिरमकर, सौ. मीनल निर्मळ, सौ. सुरेखा कुंदे, सौ. देवकर, सौ. रेणुका दौडं, आदी नागरिक मोठया प्रमाणात उपस्थित होते.