ढोकराई, श्रीगोंदा येथे अवैध गावठी हातभट्टीवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई!

अहमदनगर दि.१० जानेवारी (प्रतिनिधी)
प्रस्तुत बातमीची हकिगत अशी की, मा. श्री. राकेश ओला साहेब, पोलीस अधिक्षक अहमदनगर यांनी पोनि/श्री. अनिल कटके, स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांना जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती घेवुन कारवाई करणे बाबत आदेश दिले होते.
नमुद आदेशान्वये पोनि/श्री. अनिल कटके यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील सफौ/मनोहर शेजवळ, पोहेकॉ/बबन मखरे, संदीप घोडके, पोना/शंकर चौधरी, विशाल दळवी, पोकॉ/सागर ससाणे, मपोना/भाग्यश्री भिटे व चापोहेकॉ/उमाकांत गावडे यांचे स्वतंत्र पथक नेमुन जिल्ह्यातील अवैध धंद्यावर कारवाई करणे बाबत आदेश दिल्याने पथकातील पोलीस अंमलदार यांनी श्रीगोंदा तालुक्यात कारवाई करुन महिला आरोपीस ताब्यात घेवुन तिचे ताब्यातुन 21,000/- (एकवीस हजार) रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यामध्ये गावठी हातभट्टी तयार करणेसाठी आवश्यक असलेले 400 लिटर कच्चे रसायन व 10 लिटर तयार दारु असा मुद्देमाल जप्त व नाश करुन सदर महिला आरोपी विरुध्द श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे श्रीगोंदा पोलीस स्टेशन गु.र.नं. 08/2023 महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) (फ) प्रमाणे पोकॉ/2462 मच्छिंद्र छबु बर्डे ने. स्थानिक गुन्हे शाखा अहमदनगर यांचे फिर्यादी वरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई मा. श्री. मनोज पाटील साहेब, पोलीस अधीक्षक, अहमदनगर, श्री. प्रशांत खैरे साहेब, अपर पोलीस अधिक्षक, अहमदनगर व श्री. आण्णासाहेब जाधव साहेब, उपविभागीय पोलीस अधीकारी, कर्जत विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी व अमंलदार यांनी केलेली आहे.