खळबळजनक

अनाथ मागासवर्गीय मुलींच्या उद्धाराकरता स्थापन झालेल्या जानकीबाई आपटे बालिकाश्रम या संस्थेच्या मिळकतीची परस्परपणे विक्री करण्याचा संस्थाचालक व धनाढय बिल्डर लॉबीचा घाट! आंबेडकरी जनतेत असंतोषाची लाट!

देशस्तंभ ऑनलाईन न्यूज नेटवर्क: अहिल्यानगर: दि. 29 ऑक्टोबर: थोर समाजसेविका कर्मयोगिनी दलितमित्र जानकीबाई आपटे यांनी शोषित पिढीत दलित समाजातील अनाथ मागासवर्गीय मुलींच्या उद्धाराकरता आयुष्य वेचले त्याच अनाथ मागासवर्गीय मुलींच्या उद्धाराकरता त्यांनी जानकीबाई आपटे बालिकाश्रम ही संस्था स्थापन केली. परंतु याच संस्थेमध्ये संस्थेच्या मिळकतीची परस्परपणे विक्री करण्याचा घाट संस्थाचालक व धनाढय बिल्डर लॉबीने घातला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यामुळे यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र असंतोषाची लाट पसरली आहे .
पुणे येथील जैन मंदिर मिळकत परस्परपणे विक्री करण्याचे प्रकरण ताजे असतानाच अहिल्यानगर शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या दलित मागासवर्गीय व अनाथ मुलींकरता स्थापन केलेल्या जानकीबाई आपटे बालिकाश्रम या संस्थेच्या मिळकतीची एकमेकांशी हात मिळवणी करून विल्हेवाट लावत विक्री करण्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये संस्थेचे विद्यमान विश्वस्त व शहरातील धनाढय बिल्डर यांनी परस्परपणे हा प्रकार केला असून करोडो रुपयांच्या आर्थिक देवाण-घेवाणीतून मागासवर्गीय दलित,अनाथ, मुलींच्या उद्धाराकरता स्थापन केलेल्या मिळकतीची विक्री केली असल्याची माहिती समोर आली आहे. या व्यवहारातून संस्थेच्या विश्वस्थानी करोडो रुपयांचा अपहार केल्याची बाब समोर आली आहे. याबाबत आंबेडकरी चळवळीतून तीव्र प्रकारचा असंतोष निर्माण झालेला आहे. याबाबतीत समाज कल्याण विभाग व गृह विभाग यांच्यामार्फत चौकशी करून या प्रकरणातील दोषींविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंबेडकरी चळवळीतून होत आहे. याबाबत सदर प्रकरणातील दोषीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडणार असल्याचा पवित्रा समस्त आंबेडकरी चळवळीने घेतला आहे.
याबाबत समाज कल्याण विभाग व गृह विभाग यांच्याकडे चौकशी होणे कामी निवेदन व पत्रव्यवहार समस्त आंबेडकरी समाजाने केलेला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे