मनसेचे नितीन भुतारे यांनी नगर शहारातील तीन रोड ची गुणवत्ता चाचणी करण्यासाठी महानगर पालिका आयुक्तांना पाठविला २५हजार रुपयांचा डी डी

अहमदनगर (प्रतिनिधी) पहिल्यांदाच महानगर पालिका इतिहासात घडला असा प्रकार सदर रोडची गुणवत्ता चाचणी झाल्यास अधिकारि, ठेकेदार दोषी आढळल्यास यांच्यावर होणार कारवाई.
अहमदनगर शहारातील १)पाइपलाइन रोड, २)तारकपुर ते गंगा उद्यान, ३) तोफखाना पोलीस स्टेशन ते भिस्तबाग चौक हे रस्ते नव्याने झाले असुन त्यातील काही रस्ते खराब झाले आहेत त्यामुळे नितीन भुतारे यांनी नाशिक गुणवत्ता चाचणी सार्वजनिक बांधकाम विभााकडून कोर टेस्ट कारण्याची मागणी केली होती. त्यासाठी लागणारा खर्च नितीन भुतारे करणार असे पत्र महानगपालिका आयुक्तांना ९/६/२०२२ रोजी आयुक्तांना पाठविले महानगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभाग नाशिक गुणवत्ता विभाग यांना पत्र व्यवहार करुन तशी मागणी देखील केली चार पाच महिने उलटून देखील सार्वजनिक बांधकाम विभागाने महानगर पालिका शहर अभियंता यांना गुणवत्ता चाचणीस उपस्थीत रहावे असे कळवून देखील महानगर पालिका बांधकाम विभाग आयुक्त हे सदर रस्त्यांची टेस्ट करवून घेत नाहि जर टेस्ट घेतली तर महानगर पालिका संबधित अधिकारी यांचा नित्कृष्ट कामांचा अहवाल जनतेसमोर येईल म्हणुन गुणवत्ता चाचणीला महापालिका अधिकारी हजर राहत नाहीत. असा आरोप नितीन भुतारे यांनी केला आहे. त्यामुळे नितीन भुतारे यांनी स्वतः रजिस्टर पोस्टाने महानगर पालिका आयुक्तांना सदर रस्त्यांची गुणवत्ता चाचणी करण्यासाठी २५००० रुपयांचा रोख स्वरूपाच्या रूपात डिमांड ड्राफ्ट डी डी पाठविला आहे अशी गुणवत्ता चाचणी करीता फि भरल्यामुळे महानगर पालिका आयुक्त व बांधकाम शहर अभियंता यांच्या समोर मोठे आव्हानं निर्माण झाले असल्यामुळें तसेच सदर रस्त्यांमध्ये काही रस्ते कोर टेस्ट अधिच खराब झाल्यामुळे गुणवत्ता चाचणी अहवाल आल्यावर बांधकाम शहर अभियंता तसेच संबधित विभागाचे अभियंता , संबधित ठेकेदार यांच्यावर कारवाई होणार का हे पहाणे गरजेचे आहे.
नगर शहराच्या इतिहासात प्रथमच रस्त्यांची गुणवत्ता चाचणी करण्यासाठी पैसे भरण्याची तयारी मनसेचे नितीन भुतारे यांनी दर्शवली आहे यामुळे भविष्यात रस्त्यांच्या कामात भ्रष्टाचार रोखण्यासाठी व चांगलें रस्ते अहमदनगर शहारत तयार होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे नितीन भुतारे यांनी सांगीतले आहे.